'या' बँकेकडून ९९.६८ टक्के क्लेम सेटलमेंट रेशोची घोषणा, २०६० कोटी रूपयांचे वितरण (फोटो सौजन्य-X)
मुंबई : एचडीएफसी लाइफ या भारतातील आघाडीच्या विमा कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ मध्ये इंडिव्हिज्युअल डेथ क्लेम्समध्ये ९९.६८ टक्के क्लेम सेटलमेंट रेशो (claim settlement ratio )ची घोषणा केली आहे. कंपनीने १९,६६६ पॉलिसींअंतर्गत क्लेम्स निकाली काढले आणि एकूण २०६० कोटी रुपये मृत्यू क्लेम बेनिफिट म्हणून दिले. ९९ टक्के गैर-तपासणी क्लेम्स सर्व आवश्यक कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर पुढील कामकाजाच्या दिवसात दावेदारांच्या खात्यात जमा झाले. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये संपादित केलेल्या या आकडेवारींमधून ग्राहक केंद्रित्वाप्रती कंपनीची कटिबद्धता दिसून येते.
जीवन विमा पॉलिसी (life insurance policy) खरेदी करताना क्लेम सेटलमेंट रेशो हा विचार केला जाणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. एचडीएफसी लाइफने सातत्याने उच्च क्लेम सेटलमेंट रेशो राखला आहे आणि सर्व खऱ्या क्लेम्सच्या जलद व विनासायास सेटलमेंटसाठी प्रयत्नरत आहे. जीवितहानी भरून काढता येत नसली तरी एचडीएफसी लाइफ पॉलिसीधारकाच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेप्रती असलेली आपली कटिबद्धता पूर्ण करण्याचा प्रयत्न करते.
• आरोग्य आणि जीवनशैलीशी संबंधित माहिती किंवा मृत्यू क्लेम सेटलमेंटवर परिणाम करू शकणारी इतर कोणतीही माहिती सत्य आणि अचूकपणे उघड करण्याची आवश्यकता.
• पॉलिसीमध्ये नामनिर्देशित व्यक्तीची नोंद असणे आणि नामनिर्देशित व्यक्तीच्या तपशीलात बदल झाल्यास माहिती अपडेट करणे.
• पॉलिसीधारकाचा पत्ता आणि संपर्क तपशील बदलल्यास कंपनीला त्वरित माहिती देणे.
एचडीएफसी लाइफने त्यांच्या वैयक्तिक जीवन पॉलिसींसाठी क्लेम सेटलमेंट रेशोच्या माध्यमातून ग्राहक-केंद्रित्वाप्रती आपली कटिबद्धता सातत्याने दर्शवली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये क्लेम सेटलमेंट रेशो आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ९८.६६ टक्के, आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ९९.३९ टक्के आणि आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ९९.५० टक्के राहिला आहे. एचडीएफसी लाइफ पॉलिसींसाठी ‘डेथ क्लेम रिक्वेस्ट’चे सबमिशन कंपनीच्या वेबसाइटसह विविध टच पॉइण्ट्सच्या माध्यमातून सोपे केले आहे. यामुळे शाखेला भेट देण्याची गरज दूर होते, ज्यामुळे दावेकरांना सोयीसुविधा व विनासायास अनुभव मिळतो. या उद्देशासाठी शाखेला भेट देण्याची इच्छा असलेल्यांना कंपनी अत्यंत संवदेनशीलपणे प्राधान्य सेवा देते.
यासंदर्भात मत व्यक्त करत एचडीएफसी लाइफचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर समीर योगीश्व यांनी सांगितले की, आम्ही वेळेवर व त्रासमुक्त क्लेम सेटलमेंटला प्राधान्य देतो. ग्राहक पॉलिसी खरेदी करतो तेव्हा आम्ही त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे आर्थिकदृष्ट्या संरक्षण करण्याचे वचन देतो. क्लेम सेटलमेंट या वचनाचे समाधान आहे. आम्ही या प्रक्रियेला अधिक सोईस्कर करण्यासाठी आणि टर्न-अराऊंड-टाइम अधिक कमी करण्यासाठी आमच्या क्षमता सतत वाढवत आहोत. उद्योग म्हणून ‘२०४७ पर्यंत सर्वांसाठी विमा’ दृष्टिकोन संपादित करण्यासाठी आम्ही प्रक्रियांसह सुसज्ज असण्याची खात्री घेण्याची गरज आहे, जे आम्हाला जीवन विमा कंपन्या म्हणून आमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास सक्षम करतील”,असं मतं समीर योगीश्व यांनी व्यक्त केलं.