ऑनलाईन शॉपिंगमध्ये महिला आघाडीवर, पुरुषांच्या 52% च्या तुलनेत 60% महिला सक्रिय
मुंबई : भारतातील ऑनलाईन शॉपिंग क्षेत्रातील बदल आणि विकासामध्ये महिला आघाडीवर आहेत. 60 % महिला सक्रियपणे ऑनलाईन खरेदी करतात. ही आकडेवारी पुरुषांच्या तुलनेत जास्त आहे आणि त्यामुळे डिजिटल कॉमर्सचा स्वीकार वेगाने वाढत आहे. हाऊ इंडिया बॉरोझ 2024 – होम क्रेडिट इंडियाच्या अभ्यासानुसार, मिलेनियल्स (साधारणपणे 1980 च्या दशकात जन्मलेली पिढी) आणि जेन झी (2000 च्या दशकात जन्मलेली पिढी) यांच्यासह महिला ई-कॉमर्सचे भविष्य घडवत आहेत. त्यांना साहाय्य मिळत आहे एम्बेडेड फायनान्स सोल्यूशन्सच्या वाढत्या प्रचलनामुळे. एम्बेडेड फायनान्स सोल्यूशन्स असे वित्तीय समाधान आहेत जे सध्या अधिक प्रमाणात उपलब्ध होत आहेत आणि ज्यामुळे उधार घेणे अधिक सहज आणि वेगवान झाले आहे तसेच शॉपिंगचा अनुभव अधिक सुलभ झाला आहे.
हाऊ इंडिया बॉरोझ 2024 या अभ्यासात ग्राहकांच्या विकसनशील प्रवृत्तींवर प्रकाश टाकला आहे. असे दिसून आले आहे की 2021 मध्ये ऑनलाईन शॉपिंग 69% पर्यंत वाढली, 2023 मध्ये ती 48% पर्यंत घसरली आणि 2024 मध्ये 53% अशी परत वाढली. इन-स्टोअर शॉपिंगचे म्हणजे प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी करण्याची पद्धत पुन्हा एकदा वाढत असली, तरी डिजिटल कॉमर्स हे अजूनही प्रभावी आहे आणि त्यामध्ये महिलांचा व तरुण खरेदीदारांचा मोठा वाटा आहे.
या निष्कर्षांवर भाष्य करताना होम क्रेडिट इंडियाचे मुख्य विपणन अधिकारी आशिष तिवारी म्हणालेः “भारतातील डिजिटल खरेदी क्षेत्र विशेषकरून महिलांच्या योगदानामुळे नव्याने आकार घेत आहे. महिला केवळ ऑनलाईन खरेदीचे नेतृत्व करत नाहीत तर एम्बेडेड फायनान्समधील बदलांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. आमच्या “हाऊ इंडिया बॉरोझ 2024” (भारत कर्ज कसे घेतो 2024) अभ्यासातून असे दिसून आले आहे की महिला आत्मविश्वासाने डिजिटल साधनांचा लाभ घेत आहेत, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मदतीवर विश्वास ठेवत आहेत आणि त्यांच्या खरेदीचा अनुभव वाढवण्यासाठी कर्ज घेण्याचे अधिक फायदेशीर उपाय स्वीकारत आहेत. “होम क्रेडिट इंडिया कंपनीसाठी हा बदल म्हणजे महिलांची वाढत चाललेली आर्थिक स्वायत्तता आणि त्यांच्या बदलत्या आकांक्षांशी सुसंगत अशा सुलभ आणि सहज उपलब्ध होणाऱ्या क्रेडिट सोल्यूशन्सची आवश्यकता अधोरेखित करणारा आहे. म्हणजे हे बदल अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे आहेत.”
ऑनलाईन शॉपिंगमध्ये महिला आघाडीवर आहेत. पुरुषांच्या 52% च्या तुलनेत 60% महिला सक्रियपणे ऑनलाईन खरेदी करतात. तरुण पिढ्या देखील या प्रवृत्तीचे नेतृत्व करीत आहेत. जेन झी आणि मिलेनियल्स देखील ऑनलाईन खरेदी करण्याच्या या ट्रेंडला पुढे नेत आहेत. 58% जेन झी आणि 59% मिलेनियल्स ऑनलाईन खरेदी करतात, तर केवळ 39% जेन एक्स (सामान्यपणे 1965 ते 1980 या काळात जन्मलेली पिढी) डिजिटल कॉमर्समध्ये गुंतले आहेत. भौगोलिकदृष्ट्या, टियर-2 शहरे आणि महानगर क्षेत्रे या दोन्ही ठिकाणी ऑनलाईन शॉपिंगचा स्वीकार समान आहे. दोन्ही क्षेत्रांनी 56% ऑनलाईन शॉपिंग स्वीकारण्याचा दर नोंदवला आहे. दोन्ही ठिकाणी डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभाव किंवा उपस्थिती समान आहे. यामुळे असे दिसते की या प्रदेशांमध्ये डिजिटल गोष्टींचा विस्तार आणि स्वीकार वाढत आहे.
पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील शहरांमध्ये निम्न-मध्यमवर्गीय ग्राहकांमध्ये ही झपाट्याने होणारी वाढ विशेषकरून लक्षात येत आहे, ज्यामध्ये कोलकाता (71%), कोची (66%), हैदराबाद (64%) आणि चेन्नई (60%) हे शहर आघाडीवर आहेत. याचा अर्थ या शहरांमध्ये ई-कॉमर्स अधिक लोकांपर्यंत पोहोचले असून तेथे मोठ्या प्रमाणावर स्वीकारले जात आहे.
या अभ्यासात हे देखील अधोरेखित केले गेले की एम्बेडेड फायनान्स विशेषकरून महिलांसाठी ऑनलाईन शॉपिंग अनुभवांना कसे बदलते. महिलांसाठी, हा बदल असा आहे की कर्ज घेणे अधिक सहज होत असून खरेदी करताना निर्णय घेण्यासाठी लागणारा वेळ कमी होत आहे. एम्बेडेड फायनान्स सोल्यूशन्स पसंत करणाऱ्या सर्व कर्जदारांपैकी निम्मे असे मानतात की त्यामुळे ई-कॉमर्स व्यवहार सुलभ होतात. याव्यतिरिक्त, निम्न मध्यमवर्गीय महिला कर्जदारांपैकी 38% महिला EMI (ईएमआय) कार्डला पसंती देतात. EMI कार्ड विश्वसनीय असून ते वापरण्यामुळे कर्जाची किंवा उधारीची रक्कम ग्राहकांच्या खात्यावर लवकर उपलब्ध करून दिली जाते. यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार खरेदी करणे सुलभ होते आणि त्यामुळे डिजिटल शॉपिंग म्हणजेच ऑनलाईन खरेदीला चालना मिळते.
याबरोबरच तंत्रज्ञानावर आधारित वित्तीय उपायांवरील विश्वास वाढत आहे. जवळपास 30% प्रतिसादकर्ते, विशेषकरून महिला आणि महानगरांतील कर्जदार, चॅटबॉटच्या प्रतिसादाला विश्वसनीय मानतात, तर 26% WhatsApp (व्हॉट्सॲप) द्वारे दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या ऑफर्सवर विश्वास ठेवतात. अधिकाधिक लोक AI (कृत्रिम बुद्धिमत्ता)-चालित आर्थिक साधनांवर विश्वास ठेवायला लागले आहेत, यामुळे डिजिटल आर्थिक सहाय्याकडे वळण्याची एक सर्वसाधारण प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळे पारंपरिक आर्थिक साधनांऐवजी लोक डिजिटल साधनांकडे वळत आहेत हे सूचित होते.
ऑनलाईन शॉपिंग, एम्बेडेड फायनान्स आणि डिजिटल कर्ज देणे जसजसे वाढत जात आहे तसतसे जबाबदार कर्जाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कर्जाच्या सापळ्यात पडणे रोखण्यासाठी आर्थिक जागरूकता आवश्यक होते. विशेष म्हणजे, प्रत्येक पाच पैकी एका महिलेने आर्थिक व्यवहार, इंटरनेट बँकिंग, कर्जासाठी अर्ज कसे करावे आणि डिजिटल पेमेंट्सबद्दल जाणून घेण्याची इच्छा प्रकट केली आहे.
महिलांना आर्थिक योजना, बजेट तयार करणे आणि क्रेडिट व्यवस्थापन यांचे ज्ञान दिल्याने त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेमध्ये वाढ होते. या प्रक्रियेत महिलांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर अधिक नियंत्रण मिळवून दिले जाते, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्या स्वतंत्रपणे निर्णय घेण्यास सक्षम होतात. याचा एक व्यापक सकारात्मक परिणाम म्हणजे अर्थव्यवस्थेच्या प्रगतीत योगदान मिळतो. अशा प्रकारे महिलांचे सक्षमीकरण हे व्यक्तिगत तसेच सामाजिक विकासासाठी महत्त्वाचे ठरते. साक्षरतेतील या कमतरतेवर उपाययोजना करणे महत्त्वाचे असून महिलांना आर्थिक साक्षरता शिकवणे गरजेचे आहे, त्यामुळे त्या आपल्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवू शकतील आणि डिजिटल अर्थव्यवस्थेत आत्मविश्वासाने सहभागी होऊ शकतील.