हाऊसिंग डॉटकॉमद्वारे ऑनलाइन Property Fest ची घोषणा, 'ही' असेल शेवटची तारीख
भारताचे नंबर १ रियल इस्टेट अॅप हाऊसिंग डॉटकॉमने आपल्या बहुप्रतीक्षित ऑनलाइन प्रॉपर्टी फेस्ट ‘हॅपी न्यू होम्स २०२५ ची घोषणा केली आहे. १० मार्च पासून सुरू होऊन १० एप्रिल २०२५ पर्यंत महिनाभर चालणारा हा व्हर्च्युअल प्रॉपर्टी फेस्ट आजवरचा सर्वात मोठा फेस्ट असणार आहे आणि देशातील ३४ देशांपर्यंत त्याची पोहोच असेल. श्रेष्ठ डेव्हलपर्स, आकर्षक सौदे आणि घर खरेदीचा सुरळीत अनुभव यांच्यासह एचएनएच’२५ ऑनलाइन रियल इस्टेट क्षेत्रात नवीन मापदंड स्थापन करण्यास सज्ज आहे.
हाऊसिंग डॉटकॉमचे चीफ रेव्हेन्यू ऑफिसर अमित मसलदान म्हणाले, “लोकांना आकर्षित करून विक्री वाढवण्याच्या बाबतीत ‘हॅपी न्यू होम्स २०२५’ एक नवीन मापदंड स्थापन करेल अशी आम्हाला आशा आहे. घर खरेदीच्या क्षेत्रात सतत बदल होत आहेत, आणि आमचा फोकस आजही ग्राहकांना एक बेजोड अनुभव देण्यावर आहे. देशभरातील घर शोधणाऱ्यांसाठीचा पसंतीचा वन-स्टॉप प्लॅटफॉर्म म्हणून आपले स्थान मजबूत करताना आपल्या मालमत्तेचा शोध घेण्याच्या प्रवासात उपभोक्त्यांचा ‘एक विश्वसनीय साथी’ म्हणून पुढे येत असल्याला आम्हाला अभिमान वाटतो.”
टाटा मोटर्सचे ट्रक आता हायड्रोजनवर धावणार, काय आहेत हायड्रोजन फ्यूएलचे फायदे तोटे?
अमित मसलदान पुढे म्हणाले, “एचएनएच’२५च्या माध्यमातून आम्ही घर खरेदी करणाऱ्या आधुनिक ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि पसंती पूर्ण करणारी नावीन्यपूर्ण सोल्यूशन्स प्रदान करत आहोत. आमची वचनबद्धता केवळ मालमत्ता दाखवण्यापुरती नसून आम्ही एक व्यापक ईकोसिस्टम तयार करत आहोत, जेथे पारदर्शकता आणि टेक्नॉलॉजी यांचा संयोग असेल आणि ही ईकोसिस्टम प्रत्येक घर खरेदी करू इच्छिणाऱ्यास माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करेल. या वर्षात ३४ शहरांत झालेला आमचा लक्षणीय विस्तार देशभरातील वैविध्यपूर्ण रियल इस्टेट क्षेत्रात दर्जेदार हाऊसिंग सहजप्राप्य बनवण्याबाबतची आमची वचनबद्धता दर्शवितो.”
एचएनएच’२५ अनेक अत्याधुनिक इनोव्हेशन्स घेऊन येत आहे, ज्यांच्यामुळे घर खरेदी करण्याचा अनुभव अधिक चांगला होईल. त्या व्यतिरिक्त, या मंचावर सामील प्रत्येक कंपनीचे तपशील कसून तपासलेले असतील, ज्यामुळे घर खरेदी करणाऱ्याला खात्रीशीर पारदर्शकता आणि विश्वासार्हता मिळेल. हा इव्हेंट अधिक आकर्षक करण्यासाठी एचएनएच’२५ दरम्यान हाऊसिंग डॉटकॉम मार्फत गृह कर्ज घेणाऱ्या उपभोक्त्यांना खात्रीने कॅशबॅक मिळेल. ज्यामुळे त्यांच्या घर खरेदीच्या प्रवासात मूल्यवर्धन होईल.
BMW ने देशात 3 सीरीज LWB फेसलिफ्ट केली लाँच; जाणून घ्या फीचर्स
गेल्या वर्षी सणासुदीच्या मोसमात यशस्वीरित्या साजऱ्या झालेल्या मेगा होम उत्सव 2024 सहित मागच्या आवृत्तींच्या यशानंतर एचएनएच’२५ ने डिजिटल रियल इस्टेट क्षेत्रात लक्षणीय क्रांती केली आहे. यातून भारतातील रियल इस्टेट क्षेत्रात प्रॉपटेक इव्हेंट्सचे वाढते प्रमाण दिसून येते. हे इव्हेंट घर शोधणाऱ्या लोकांना 4400 पेक्षा जास्त डेव्हलपर्स आणि चॅनल भागीदारांशी जोडतात आणि महानगरे, टियर-२ आणि टियर-३ शहरांतील निवासी मालमत्तांचे व्यापक पर्याय प्रदान करतात.