Stock Market Today: बाजारात आज तेजी राहण्याचे संकेत, हे शेअर्स गुंतवणूकदारांचे नशिब बदलण्याची शक्यता; काय म्हणाले तज्ज्ञ?
जागतिक बाजारातील संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, वर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. काल शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली होती. मात्र आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. सोमवारी २ जून रोजी सेन्सेक्स ७७.२६ अंकांनी म्हणजेच ०.०९% ने घसरून ८१,३७३.७५ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ३४.१० अंकांनी म्हणजेच ०.१४% ने घसरून २४,७१६.६० वर बंद झाला.
Todays Gold-Silver Price: सोन्याच्या किंमतीत झाली वाढ, चांदीनेही पार केला लाखोंचा टप्पा
भारतीय बाजारांसाठी आज चांगले संकेत देण्यात आले आहेत. निफ्टी सुमारे ५० अंकांनी वाढ दर्शवत आहे. आशियामध्येही तेजी दिसून येत आहे. गुंतवणूकदार आज युनायटेड स्पिरिट्स , हॅरिसन्स मल्याळम आणि ल्युपिन या तीन स्टॉक्सच्या खरेदी आणि विक्रीबाबत विचार करू शकतात. पुढील काही सत्रांमध्ये निफ्टीमध्ये वाढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
इंटेलेक्ट डिझाइन अरेना लिमिटेड, व्हॅलर इस्टेट लिमिटेड (डीब्रेल्टी), भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, ओबेरॉय रिअॅलिटी लिमिटेड, सोना बीएलडब्ल्यू प्रेसिजन फोर्जिंग्ज लिमिटेड, फेडरल बँक लिमिटेड, हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेड या स्टॉक्सच्या खरेदीबाबत आज गुंतवकणूकदार विचार करू शकतात. कारण तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, हे शेअर्स आज तेजीत राहण्याची शक्यता आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड किंवा भेल हे स्टॉक्स देखील आज गुंतवणूकदारांना चांगली कमाई करण्याची संधी देण्याची शक्यता आहे.
१०० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याऱ्या स्टॉक्समध्ये आज इंडियन ओव्हरसीज बँक, ओला इलेक्ट्रिक, येस बँक, टीटीएमएल, पीएसबी आणि सिगाची इंडस्ट्रीज यांचा विचार केला जाऊ शकतो. खरं तर रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे आणि पुन्हा एकदा टॅरिफ युद्धाच्या चिंतेमुळे जागतिक बाजारपेठा मंदावल्या आहेत.
सोमवारी निफ्टी ५० जवळजवळ ३४ अंकांनी घसरून २४७१६ वर बंद झाला, तर बीएसई सेन्सेक्स ८१३७३ अंकांनी किंचित घसरून बंद झाला. निफ्टी पीएसयू बँक, एफएमसीजी, ऑटो, रिअल्टी, फार्मा हे शेअर्स तेजीत होते. मंगळवार, ३ जून रोजी शेअर बाजार किंचित वाढून उघडण्याची अपेक्षा आहे, गुंतवणूकदार जागतिक घडामोडींवर आणि रिझर्व्ह बँकेच्या (RBI) आगामी व्याजदर निर्णयावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सकाळी ८:१५ वाजता, गिफ्ट निफ्टी फ्युचर्स २४,८४५.५ वर व्यवहार करत होते.