Stock Market Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच बाजारात होणार घसरण? तज्ज्ञांनी काय सांगितलं? जाणून घ्या
७ जुलै रोजी आज शेअर बाजार सुरु राहणार आहे. ७ जुलै रोजी मोहरमचा १० वा दिवस साजरा केला जाणार होता, त्यामुळे आज शेअर बाजार बंद राहणार असल्याची अपडेट काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. मात्र या वर्षी मोहरमचा १० वा दिवस, आशुरा, ६ जुलै रोजी साजरा करण्यात आला. त्यामुळे बँका, सरकारी कार्यालये, पोस्ट ऑफिस, शाळा आणि इतर सार्वजनिक संस्था ७ जुलै रोजी खुल्या राहतील. ७ जुलै रोजी सार्वजनिक सुट्टी नसल्याने, शेअर बाजार देखील मोहरमच्या दिवशी खुले राहतील आणि नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू ठेवतील.’
Flipkart GOAT सेलपूर्वीच पडली Samsung Galaxy S24 Ultra ची किंमत! असा घ्या डिस्काऊंट आणि ऑफरचा फायदा
आठवड्याच्या सुरुवातीला आज शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कर आकारणीवरील गोंधळामुळे जागतिक बाजारातील कमकुवत संकेत लक्षात घेता, सोमवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, घसरणीने उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सपाट सुरुवात दर्शवितात. (फोटो सौजन्य – Pinterest)
शुक्रवारी, देशांतर्गत शेअर बाजाराने दोन दिवसांच्या घसरणीला ब्रेक लावला आणि उच्चांक गाठला, बेंचमार्क निफ्टी ५० २५,४०० च्या वर राहिला. सेन्सेक्स १९३.४२ अंकांनी म्हणजेच ०.२३% ने वाढून ८३,४३२.८९ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ५५.७० अंकांनी म्हणजेच ०.२२% ने वाढून २५,४६१.०० वर बंद झाला. शुक्रवारी बँक निफ्टी निर्देशांक २३९.९५ अंकांनी म्हणजेच ०.४२% ने वाढून ५७,०३१.९० वर बंद झाला. यानंतर आज आठवड्याची सुरुवात कशी होणार आहे आणि गुंतवूकदारांसाठी कोणते शेअर्स महत्त्वाचे ठरणार आहेत, याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आज 7 जुलै रोजी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने होणार असल्याचा अंदाज आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कर आकारणीवरील गोंधळामुळे घसरणीसह सुरुवात होण्याची शक्यता आहे. इंडसइंड बँक, टाटा स्टील, रेल विकास निगम लिमिटेड, श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी, अल्ट्राटेक सिमेंट, डाबर इंडिया, ज्योती सीएनसी ऑटोमेशन, सेन्को गोल्ड, बीईएमएल, आयडीबीआय बँक हे शेअर्स आज गुंतवणूकदारांचं नशिब बदलण्याची शक्यता आहे.
शॉपिंगसाठी तयार आहात ना! या दिवशी सुरु होतोय Amazon प्राइम डे सेल, Top Deals चा झाला खुलासा
प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना सालासर टेक्नो इंजिनिअरिंग , वेल्सपन लिव्हिंग आणि इन्फोसिस हे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. आज १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करणाऱ्या सहा इंट्राडे स्टॉकमध्ये पीसी ज्वेलर , सूर्य लक्ष्मी कॉटन मिल्स, सालासर टेक्नो इंजिनिअरिंग , ट्रायडंट , एबीएफआरएल आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांची शिफारस करण्यात आली आहे.