मुंबई– आरबीयने पुन्हा एकदा सामान्यांना झटका दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikant Das) यांनी बुधवारी यंदाचं (8 फेब्रुवारी) पतधोरण जाहीर केलं आहे. या नव्या पतधोरणामुळे आता सर्वसामान्यांना ‘जोर का झटका…’ लागला आहे. आरबीआयने यंदा रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ केल्याची घोषणा केली आहे. रेपो रेटमध्ये (Repo Rate) सलग सहाव्यांदा दरवाढ केली आहे. यामुळे रेपो रेट आता 6.50 टक्के झाला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये (Repo Rate) 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये सलग सहाव्यांदा वाढ केली आहे. यानंतर रेपो रेट 6.25 टक्क्यांवरुन 6.50 टक्के झाला आहे. या धोरणाची घोषणा करताना आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, महागाई हा देशातील चिंतेचा विषय आहे. (Repo Rate Increase)
रेपो रेटचा बजेटवर फरक पडणार…
दरम्यान, रेपो रेट वाढल्याने याचा परिणाम गृहकर्ज, वाहन कर्ज यावर होणार आहे, तर वैयक्तिक कर्जाच्या EMI (हफ्ते) यावर देखील परिणाम जाणवणार आहे. त्यामुळं सामान्यांना झटका बसणार आहे. मे 2022 पासून रेपो रेटमध्ये आतापर्यंत 2.25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रेपो रेट मध्ये वाढ झाल्याने कर्जाचा हफ्ताही महागतो. यामुळे जर तुम्ही फ्लोटिंग रेटवर गृह कर्ज किंवा इतर कोणतंही कर्ज घेतलं असेल तर त्याचा ईएमआय वाढेल. दुसरीकडे रेपो रेटमध्ये वाढ झाल्यांतर बँक एफडीसह इतर ठेवींवर अधिक व्याज देऊ शकतात म्हणजेच ठेवींचे दर वाढू शकतात.
रेपो रेट म्हणजे काय?
अनेकांना प्रश्न पडतो की, रेपो रेट म्हणजे काय? किंवा यामुळं आपल्या बजेटवर याचा काय परिणाम पडतो. ज्या दराने बँका रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेते त्या दराला रेपो दर (Repo Rate) म्हणतात. रेपो दर वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणे. तर, रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. याचाच अर्थ आरबीआयने रेपो दरात वाढ केली तर सामान्यांच्या कर्जात वाढ होते. अर्थात तुमच्या व्याजदरात व हफ्तामध्ये वाढ होते.