ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाईचा दर 6.2 टक्क्यांवर, 14 महिन्यांतील उच्चांक गाठला
अन्नधान्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाईचा दर 6.2 टक्क्यांवर पोहेचला आहे. हा दर 14 महिन्यांतील सर्वोच्च दर आहे. किरकोळ महागाईच्या दराने ऑक्टोबरमध्ये 14 महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. किरकोळ महागाईने रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने ठरवून दिलेली वरची मर्यादा ओलांडली आहे. यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) डिसेंबरच्या बैठकीत व्याजदर कमी करण्याची शक्यता फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे.
हेदेखील वाचा- सलग तिसऱ्यांदा ‘ही’ कंपनी देणार बोनस शेअर्स; 4 वर्षात शेअर्समध्ये 8100 टक्क्यांनी वाढ!
दरम्यान, सप्टेंबरमध्ये देशातील औद्योगिक उत्पादन (IIP) 3.1 टक्क्यांनी वाढले आहे. ऑगस्टमध्ये औद्योगिक उत्पादनात घट झाली होती परंतु सणासुदीमुळे सप्टेंबरमध्ये उत्पादन वाढले. ऑक्टोबरमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित अन्नधान्य महागाई दर 10.87 टक्के होता, जो 15 महिन्यांतील उच्चांक आहे. या काळात भाजीपाला, फळे आणि धान्याच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य- pinterest)
प्रामुख्याने बटाटे, कांदे आणि टोमॅटोसह खाद्यपदार्थांच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. महागड्या खाद्यपदार्थांमुळे ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाईचा दर 6.2 टक्क्यांवर पोहेचला आहे. हा गेल्या 14 महिन्यांतील महागाईचा सर्वोच्च उच्चांक आहे. 14 महिन्यांपूर्वी म्हणजेच ऑगस्ट 2023 मध्ये महागईचा दर 6.83 टक्क्यांवर पोहोचला होता. त्यानंतर आता ऑक्टोबर 2024 मध्ये महागाई सर्वोच्च दरावर पोहोचली आहे. सप्टेंबरमध्ये भाज्यांच्या किमतीमुळे महागाईचा दर 5.49 टक्क्यांवर पोहोचला होता.
महागाईच्या या वाढत्या दरात खाद्यपदार्थांचा वाटा 50 टक्के आहे. कारण भाजीपाल्यांसोबतच खाद्य पदार्थांच्या किंंमती देखील प्रचंड वाढल्या आहेत. खाद्य पदार्थांचा महागाई दर 9.24 टक्क्यांवरून 10.87 टक्क्यांवर पोहोचला आहे. या महागाईचा सर्वसामान्यांवर प्रचंड परिणाम होत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. तसेच गुंतणुकदारांवर देखील महागाईचा परिणाम होतो.
हेदेखील वाचा- सोन्याचे दर 8000 रुपयांनी कमी होणार; ‘हे’ आहे कारण…; वाचा… आजचे सोन्या-चांदीचे दर!
महागाई दर वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमती. ऑक्टोबरमध्ये किरकोळ चलनवाढीने 14 महिन्यांत पहिल्यांदा म्हणजेच ऑगस्ट 2023 नंतर पहिल्यांदाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीने ठरवून दिलेली वरची मर्यादा ओलांडली आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, किरकोळ चलनवाढीचा दर ऑक्टोबरमध्ये 6.2 टक्क्यांवर पोहोचला, जो मागील महिन्यात 5.49 टक्के होता.
ऑक्टोबर 2023 मध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई 4.87 टक्के होती. मात्र आता हा दर 6.2 टक्क्यांवर पोहोचला आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) वर आधारित वार्षिक चलनवाढीचा दर 6.2 टक्के आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील महागाई दर अनुक्रमे 6.68 टक्के आणि 5.62 टक्के आहे.
NSO डेटा दर्शविते की ऑक्टोबर 2024 मध्ये ‘डाळी’, अंडी, ‘साखर आणि मिठाई’ आणि मसाल्यांच्या महागाईत लक्षणीय घट नोंदवली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये भाजीपाला, फळे आणि तेल यांच्या किमतीत वाढ झाली. डिसेंबर 2024 मध्ये दर कमी होण्याची शक्यता नाही. महागाईत सातत्याने वाढ होत असून, त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. ऑक्टोबरमध्ये कांद्याच्या दरात झालेली वाढ चिंताजनक आहे. घाऊक कांद्याचे दर 40 ते 60 रुपये किलोवरून 70 ते 80 रुपये किलो झाले आहेत. मुख्यतः भाज्या आणि खाद्यतेलामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत.