भारतीय ब्रँड्सची 'ग्लोबल' भरारी! (Photo Credit- X)
ब्रँडने मोठी आकडेवारी गाठली म्हणजे जगभरात ब्रँडची उपस्थिती वाढली असा अर्थ होत नाही. यासाठी उत्तम धोरण आणि सांस्कृतिक समर्पितता गरजेची आहे. नवीन बाजारपेठेत प्रवेश करताना त्या बाजारपेठेच्या स्थितीबाबत माहित असले पाहिजे. यासाठी स्थानिक व्यवहाराबाबत सखोल माहिती, स्पष्ट उद्देश आणि स्थितीनुसार जुळवून घेण्याची चपळता आवश्यक आहे. अनुभवामधून मला शिकवण मिळाली आहे की, मायभूमीमध्ये स्पष्ट प्रयत्नांसह परदेशातील यशाची सुरूवात होते. योग्य प्रश्न विचारत, योग्य सहयोगी निवडत आणि उद्देशासह निर्मिती करत यशस्वी वाटचालीची सुरूवात होते.
आंतरराष्ट्रीय स्तरावर विकासामधील गुंतागूंतींचा सामना करण्यासाठी सर्वोत्तम दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. अशीच एक पद्धत म्हणजे एमएपीएस फ्रेमवर्क – मार्केट, अॅसेस, पोझीशन, स्ट्रक्चर. या धोरणात्मक पैलूंसह ब्रँड्स त्यांच्या महत्त्वाकांक्षेला प्रत्यक्षात आणू शकतात, तसेच विस्तारीकरण विकासात्मक व स्थिर असण्याची खात्री घेऊ शकतात.
पहिली पायरी म्हणजे मार्केट आयडेण्टिफिकेशन म्हणजे बाजारपेठेबाबत ओळख, जेथे ब्रँड्सच्या ऑफरिंग्जना प्राधान्य दिले जाईल अशा जागतिक स्तरावरील प्रांतांचा शोध घेतला पाहिजे. म्हणजे, प्रांतांची आर्थिक विकास आकडेवारी जाणून घेण्यासोबत प्रमुख बाबींची तपासणी केली पाहिजे, जसे पायाभूत सुविधा विकास, मागणी पद्धती आणि क्षेत्राशी संबंधित ट्रेण्ड्स. उदाहरणार्थ, गतीशीलता क्षेत्रातील कंपनी लॉजिस्टिक्स किंवा बांधकामामध्ये प्रगती करत असलेल्या प्रांतांवर लक्ष्य करू शकते, ज्यामधून बाजारपेठ सक्रियपणे विश्वसनीय सोल्यूशन्सचा शोध घेत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
एकदा का विकासाची क्षमता असणाऱ्या बाजारपेठा जाणल्या की मग त्यांच्या विकासाच्या अंमलबजावणीला सुरूवात होते (अॅसेस ऑन-ग्राऊंड रिअॅलिटीज). अशा वेळी या माहितीचा उपयोग होतो. स्थानिक भागधारक, वितरक, नियामक, वित्त पुरवठादार यांच्यासोबत सल्लामसलत केल्याने जो फायदा होतो तो केवळ आकड्यांच्या माहितीमुळे होत नाही. सर्वांगीण दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी बाजारपेठेला भेट दिली पाहिजे, तेथे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसोबत चर्चा केली पाहिजे आणि सांस्कृतिक पैलू जाणून घेतले पाहिजे. या माहितीमधून अनेकदा छुपी आव्हाने किंवा संधींबाबत समजते, ज्या बाजारपेठेत प्रवेश केल्यानंतर यशस्वी होण्यास साह्यभूत ठरू शकतात.
तिसरी पायरी आहे पोझिशनिंग विदिन ब्रँड स्ट्रॅटेजी म्हणजे ब्रँड धोरणांतर्गत स्थिती निर्धारित करणे. प्रत्येक लक्षवेधक बाजारपेठेत कंपनीच्या दीर्घकालीन ध्येयांची पूर्तता होत नाही. काही बाजारपेठांमध्ये त्वरित यश मिळते, तर काही बाजारपेठांमध्ये यशस्वी होण्यासाठी संयमाची आवश्यकता असते, पण फायदा मिळण्याची खात्री असते. यासाठी धोरणाचे पालन केले पाहिजे. ब्रँड्सनी विचारले पाहिजे की संबंधित बाजारपेठ त्यांचे उद्देश, क्षमता व विकास दृष्टिकोनाकरिता अनुकूल आहे का? ब्रँड्सच्या मुलभूत क्षमतांशी संलग्न नसलेल्या बाजारपेठेत प्रवेश केल्यास अल्पकालीन फायदा होऊ शकतो, पण दीर्घकाळापर्यंत समन्वय राहणार नाही.
शेवटचे म्हणजे, स्ट्रक्चरिंग द एण्ट्री मॉडेल म्हणजे बाजारपेठेत प्रवेशासंदर्भात धोरण आखणे. प्रत्येक पैलूचे बारकाईने निरीक्षण केले पाहिजे. उत्पादन मिश्रण निर्धारित करा, योग्य व्यवसाय मॉडेल निवडा आणि स्थानिक सहयोग निर्माण करा. प्रत्यक्ष प्रवेश, संयुक्त उद्यम किंवा वितरक-नेतृत्वित मॉडेल्स यांमधून निवड करताना बाजारपेठेचे नियामक, आर्थिक स्थिती व सांस्कृतिक क्षेत्र यांचा विचार करा. असेम्ब्ली स्वरूप, वित्त पुरवठा पर्याय असा प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे.
पण, व्यवसायासाठी योग्य बाजारपेठ निवडणे ही फक्त सुरूवात आहे. व्यवसायाची योग्यरित्या अंमलबजावणी खरे आव्हान आहे. नवीन भौगोलिक क्षेत्रांमध्ये यशस्वी होण्यासाठी कंपनीने स्थानिक स्थितींशी जुळून जाण्यासोबत त्यानुसार धोरण व कार्यसंचालन आखले पाहिजे. यासंदर्भात सुव्यवस्थित योजना उपयुक्त ठरू शकते, ज्यामधून ब्रँडचा दृष्टिकोन दिसून येईल, उपलब्ध संसाधनांचा फायदा घेतला जाईल आणि कंपनीची जोखीम क्षमता स्पष्टपणे दिसून येईल. ही सुस्पष्टता नियामक आवश्यकतांची पूर्तता करण्यामध्ये मदत करते, क्षमतापूर्ण स्थानिक टीमला एकत्र आणते आणि बाजारपेठेत विश्वास निर्माण करते.
धोरणाला प्रत्यक्षात राबवण्यासह व्यवसायाच्या विकासाला सुरूवात होते. कार्यक्षम पुरवठा साखळी, सर्वोत्तम किंमत धोरणे आणि स्थानिक पसंती दिसून येणारी उत्पादने हे सर्व घटक सुरूवातीला लक्ष वेधून घेण्यास साह्यभूत ठरतात. पण, उत्पादनाव्यतिरिक्त ग्राहकांना मिळालेला उत्तम अनुभव त्यांच्यामध्ये कंपनीबाबत निष्ठा निर्माण करतो. विक्रीनंतर भक्कम पाठिंबा, प्रतिसादात्मक सेवा आणि सांस्कृतिक संवेदनशीलता ऑपरेशनल पर्याय असण्यासोबत विश्वास निर्माण करणारे स्रोत देखील आहेत.
जागतिक स्तरावर यशस्वी होण्यासाठी बाजारपेठेतील स्थितीशी जुळून जाणे आवश्यक आहे. बाजारपेठा विकसित होतात तसे ग्राहकांच्या पसंतींमध्ये बदल होतो. नियम बदलतात. ज्यामुळे ब्रँड्सनी दक्ष राहिले पाहिजे, सतत बाजारपेठेबाबत माहिती मिळवत राहिले पाहिजे आणि स्वत:चा दृष्टिकोन बदलला पाहिजे. स्थिरता व उत्तम प्रतिसादासह दीर्घकाळापर्यंत यश गाठता येते. ग्राहकांशी संलग्न राहा, बाजारपेठेबाबत माहिती जाणून घेत राहा आणि बाजारपेठेतील स्थितीनुसार धोरणांमध्ये बदल करा.
रिटेल फायनान्स, स्थानिक स्तरावर मार्केटिंग आणि विक्रीनंतर पाठिंबा असे व्यवसाय वाढीला साह्य करणारे घटक देखील महत्त्वाचे आहेत. हे घटक व्यवसायाला पाठिंबा देण्यासोबत विकास करण्यामध्ये देखील मदत करतात. समर्पित ऑन-ग्राऊंड टीम गतीशीलता व प्रतिसादाची खात्री घेते, तर रोजगार, सीएसआर व सहयोगांच्या माध्यमातून समुदायाशी संलग्न झाल्यास ब्रँड्स स्थानिक पातळीवर लोकप्रिय होण्यास मदत होते.
हा दृष्टिकोन प्रत्यक्षात येण्याचे एक उदाहरण म्हणजे काही भारतीय कंपन्या उत्पादने निर्यात करण्यासोबत स्थानिक उत्पादन किंवा असेम्ब्ली उपस्थिती स्थापित करण्यापर्यंत विकसित झाल्या आहेत. या परिवर्तनासह कंपन्यांची खर्च कार्यक्षमता सुधारली आहे, तसेच स्थानिक अर्थव्यवस्थांसोबत त्यांचा सहयोग वाढला आहे. हे मॉडेल टाटा मोटर्स सारख्या विविध भारतीय उद्योगांसाठी यशस्वी ठरले आहे, जेथे त्यांनी स्थानिक सहयोग व सर्वोत्तम उत्पादन धोरणांचा फायदा घेत विविध बाजारपेठांमध्ये उपस्थिती निर्माण केली आहे.
शेवटचे म्हणजे, उत्पादने निर्यात करण्यासोबत उद्देशासह प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यावर जागतिक विस्तारीकरण अवलंबून असते. ब्रँड्सनी कार्यरत राहण्यासोबत बाजारपेठेतील ग्राहकांसोबत दृढ संबंध निर्माण केले पाहिजेत. ब्रँड स्थानिक पातळीवर लोकप्रिय ठरतो तेव्हा बाजारपेठेत मोठे स्थान मिळते, ग्राहकांमधील ब्रँडप्रती विश्वास अधिक पक्का होतो.
भारतीय ब्रँड्सना जागतिक स्तरावर पोहोचण्याची संधी मोठ्या प्रमाणात आहे. पण झपाट्याने नाही तर स्थिर गतीने वाटचाल केली पाहिजे. यामध्ये संयमता, अचूकता आणि उद्देशाची गरज आहे. पण त्यामधून वैविध्यपूर्ण विकास, जागतिक मान्यता आणि जगाचा भारताकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला आकार देण्याची संधी असे विविध फायदे मिळू शकतात. यशाच्या दिशेने वाटचाल करण्याची महत्त्वाकांक्षा असलेले ब्रँड्स निश्चितच भारताव्यतिरिक्त जागतिक स्तरावर आपली प्रबळ उपस्थिती निर्माण करतील.






