भारतीय रेल्वे वापरणार 'हे' प्रगत तंत्रज्ञान; प्रवाशांची समस्या चुटकीसरशी सुटणार!
गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय रेल्वेमध्ये मोठ्या सुधारणा पाहायला मिळत आहे. सरकारने रेल्वेच्या ताफ्यात द्रुतगती मार्गावर चालणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू केल्या आहेत. ज्यामुळे देशवासियांना प्रवास करणे सोईचे होत आहे. अशातच आता सरकारकडून रेल्वेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि इंटरनेट ऑफ थिंग्स तंञज्ञान (आयओटी) वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आता रेल्वेने दुरचा प्रवास करताना शौचालयातील पाणी येत नसेल तर प्रवाशांची ही समस्या चुटकीसरशी सुटणार आहे.
काय असले नेमकी समस्या
तुम्ही लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेने प्रवास केला असेल, तर तुम्हाला शौचालयात पाणी नसल्याची समस्या कधी जाणवली असेल. ट्रेनमध्ये पाणीच येत नसेल तर तुम्ही शौचालयाचा वापर करू शकत नाही. हात-पाय-तोंड धूवू शकत नाही. माञ, आता प्रवाशांना ही समस्या जाणवणारी नाही.भारतीय रेल्वेने यासाठी आधुनिक तंञज्ञानाचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि इंटरनेट ऑफ थिंग्स तंञज्ञान (आयओटी) तंञज्ञानामुळे ही समस्या सुटणार आहे.
हेही वाचा – भारत देश अस्थिर बनण्याचा धोका, नारायण मुर्ती यांच्याकडून भिती व्यक्त; वाचा… काय म्हणालेत
ब्रह्मपुत्रा मेलपासून हे तंञज्ञान वापरण्यास सुरुवात
ईशान्य पुर्व रेल्वेने आसाममधील कामाख्याहून दिल्लीला येणाऱ्या ब्रह्मपुत्रा मेलपासून हे तंञज्ञान वापरण्यास सुरुवात केली आहे. वास्तविकता या ट्रेनला पाच रॅक आहेत. परंतु, एका रॅकमध्ये अत्याधुनिक जल पातळी निरीक्षण यंत्रणा बसवण्यात आली आहे. ही रेक १६ ऑगस्टला कामाख्याहून दिल्लीला रवाना झाली. जिचे उद्घाटन एनएफआरचे जीएम चेतन कुमार श्रीवास्तव यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
हेही वाचा – मासेपालन व्यवसायातून महिलेने साधली आर्थिक प्रगती; करतीये वर्षाला 45 लाखांची कमाई!
काय आहे ही आधुनिक प्रणाली
चेतन कुमार श्रीवास्तव यांनी या प्रणालीबाबत बोलताना म्हटले आहे की, रेल्वेच्या रॅकच्या एसी कोचमध्ये, पाण्याची साठवण टाकी स्लंगखाली किंवा कोचच्या खाली असलेल्या चाकाजवळ असते. त्यात भरलेले पाणी मोटारीने शौचालयात पाठवले जाते. आता अंडर स्लंग वॉटर टँकमध्ये अशी उपकरणे बसवण्यात आली आहेत. ज्यामुळे कोणत्या टाकीत किती पाणी शिल्लक आहे. हे कळण्यास मदत होईल. पाण्याची पातळी 30 टक्क्यांपेक्षा कमी होताच, गुवाहाटीमधील कॅरेज कंट्रोलवर ताबडतोब अलर्ट पोहोचेल. यानंतर ट्रेनमध्ये तैनात असलेले कर्मचारी आणि पुढील पाणी भरण्याच्या स्टेशनची माहिती मिळेल, ज्यातून ट्रेन जात आहे.