भारत देश अस्थिर बनण्याचा धोका, नारायण मुर्ती यांच्याकडून भिती व्यक्त वाचा... काय म्हणालेत
देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापक आणि आघाडीच्या उद्योजकांपैकी एक नारायण मूर्ती यांनी भारतासमोरील सर्वात मोठ्या आव्हानाबद्दल सांगितले आहे. अनेक अर्थतज्ञ भारताच्या बाजूने लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाबद्दल बोलत असताना, मूर्ती यांचा असा विश्वास आहे की झपाट्याने वाढणारी लोकसंख्या हे देशाच्या टिकाऊपणासाठी सर्वात मोठे आव्हान असणार आहे. नारायण मूर्ती हे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.
ही आहेत देशासमोरील मोठी आव्हाने
वाढत्या लोकसंख्येमुळे भारतासमोर अनेक गंभीर आव्हाने उभी आहेत. यात प्रामुख्याने दरडोई जमिनीची उपलब्धता, आरोग्य सुविधा इ. अशी मोठी आव्हाने देशासमोर उभी आहेत. भारताच्या तुलनेत अमेरिका, ब्राझील आणि चीनसारख्या देशांमध्ये दरडोई जमिनीची उपलब्धता अधिक आहे. भारतात आणीबाणीनंतर या समस्येकडे आपण लक्ष दिले नाही, जी देशाच्या टिकावासाठी धोकादायक बनली आहे. असेही नारायण मूर्ती यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – खासगी नोकरदार दोन वेळच्या जेवणासाठी झगडतायेत; वर्क इंडियाचा धक्कादायक अहवाल समोर!
लोकसंख्येच्या बाबतीत चीनला पछाडले
सध्याच्या घडीला भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला आहे. बराच काळ चीन हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होता, माञ, आता भारताने चीनला मागे टाकले आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (डब्लूटीओ) अंदाजानुसार भारताची लोकसंख्या १.४४ कोटींपेक्षा जास्त आहे, तर चीनची लोकसंख्या १.४२ कोटी इतकी आहे. नेमकी याचवेळी आता नारायण मुर्ती यांनी हे विधान केल्याने त्यास मोठे महत्व प्राप्त झाले आहे.
वाढती लोकसंख्या धोक्याचे लक्षण
सध्या अनेक अर्थतज्ज्ञ आणि तज्ज्ञांच्या मतांपेक्षा नारायण मुर्ती यांनी वेगळे मत मांडले आहे. अनेक तज्ञ भारताच्या वाढत्या लोकसंख्येला समस्येऐवजी वरदान म्हणून संबोधत आहेत. याला भारतासाठी डेमोग्राफिक डिव्हिडंड असे संबोधण्यात आले असून, त्यामुळे भारताला स्वस्त मानवी श्रम उपलब्ध होत आहेत. जे अर्थव्यवस्था पुढे नेण्यासाठी सकारात्मक बाब आहे. माञ, नारायण मुर्ती यामुळे देशाचे भविष्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली आहे.
हेही वाचा – रक्षाबंधन हा फक्त सण नाही, …तर देशभरात होते तब्बल 12000 कोटींची उलाढाल! वाचा सविस्तर…
भारताला जागतिक हब म्हणणे घाईचे
याशिवाय नारायण मुर्ती यांनी म्हटले आहे की, भारताला सध्या तरी जागतिक हब किंवा ग्लोबल लीडर म्हणणे घाईचे ठरणार आहे. चीन आधीच जगाचा कारखाना बनला आहे. इतर देशांच्या सुपरमार्केट आणि होम डेपोमध्ये विकल्या जाणाऱ्या सुमारे 90 टक्के वस्तू चीनमध्ये बनतात. त्यांच्या अर्थव्यवस्थेचा आकार भारताच्या 6 पट आहे. त्यामुळे भारत सध्या तरी मॅन्युफॅक्चरिंग हब बनेल असे म्हणणे फार घाईचे ठरणार आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.