फोटो सौजन्य: iStock
भारतात अनेक IT कंपन्या आहेत, पण त्यातही अनेक तरुण Infosys मध्ये काम करण्यास जास्त उत्सुक असतात. अनेकदा सोशल मीडियावर Infosys च्या वर्कप्लेस संबंधित व्हिडिओज व्हायरल होत असतात. ज्यामुळे अनेक आयटी इंजिनिअर इन्फोसिसमध्ये काम करण्याची संधी मिळावी यासाठी जास्त उत्सुक असतात. पण आजच्या जमान्यात, कधी कोणाला आपली नोकरी गमवावी लागेल हे सांगता येत नाही. अशीच काहीशी घटना इन्फोसिसमधील 700 फ्रेशर्ससोबत घडली आहे. नेमके घडलं काय चला जाणून घेऊया.
भारतातील आयटी क्षेत्रातील एक मोठी कंपनी असलेल्या इन्फोसिसने त्यांच्या म्हैसूर कॅम्पसमधून सुमारे 700 फ्रेशर्सना काढून टाकले आहे. आयटी कर्मचारी संघटना नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट (nites) ने शुक्रवारी ही माहिती देताना म्हंटले की कंपनीत सामील झाल्यानंतर काही महिन्यांतच या फ्रेशर्सना काढून टाकले जात आहे.
Donald Trump यांचा ‘हा’ एक निर्णय आणि Adani Group ला मिळाला दिलासा, शेअर्समध्ये सुद्धा वाढ
पदवीधर झाल्यानंतर दोन वर्षांची दीर्घ प्रतीक्षा केल्यानंतर अखेर सप्टेंबर 2024 मध्ये इन्फोसिसमध्ये काम करण्याची संधी 700 फ्रेशर्सला मिळाली होती. पण आता अवघ्या सहा महिन्यांत त्यांना ही संधी गमवावी लागली आहे. ही बातमी त्यांच्या कुटुंबियांना कशी कळवायची याची आता त्या फ्रेशर्सना चिंता आहे.
NITES चे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, हे धक्कादायक आणि अनैतिक देखील आहे. इन्फोसिसने काही महिन्यांपूर्वीच नियुक्त केलेल्या सुमारे 700 कॅम्पस रिक्रूटला कामावरून काढून टाकण्यास सुरुवात केली आहे.
पट्ठ्याने सोडला स्पर्धा परीक्षेचा नाद, उतरला व्यावसायिकांच्या स्पर्धेत ; आता महिन्याला छापतोय लाखो!
या प्रकरणाची अधिक चौकशी करावी आणि औद्योगिक वाद कायदा, 1947 चे उल्लंघन केल्याबद्दल इन्फोसिसवर कठोर दंडात्मक कारवाई करावी.
कायदेशीर चौकशी पूर्ण होईपर्यंत पुढील कर्मचाऱ्यांची कपात थांबवावी.
सर्व काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना भरपाईसह पुन्हा कामावर घेण्यात यावे.
NITES ने आरोप केला आहे की कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या प्रक्रियेदरम्यान धमकावण्यासाठी बाउन्सर आणि सुरक्षा रक्षक देखील तैनात केले होते. याबद्दल सोशल मीडियावर गदारोळ सुरू आहे. एका युजरने राग व्यक्त करत लिहिले, “हे हृदयद्रावक आहे.” इन्फोसिसकडून ऑफर लेटर मिळाल्यानंतर, या फ्रेशर्सनी २-२.५ वर्षे वाट पाहिली आणि अखेर सप्टेंबर 2024 मध्ये ते कंपनीत सामील झाले. आता, फक्त सहा महिन्यांनंतर, यापैकी 700 लोकांना कंपनीतून काढून टाकण्यात आले. त्यांच्यापैकी बरेच जण असतील ज्यांनी या ऑफरसाठी इतर नोकरी नाकारली असेल.