फोटो सौजन्य- iStock
विष्णू प्रकाश आर पुंगलियाचे शेअर्स शुक्रवारी (ता.१८) ट्रेडिंग दरम्यान 14 टक्क्यांनी वाढून, 325 रुपयांवर पोहोचले आहे. ही त्याची 52 आठवड्यांची उच्च किंमत होती. शेअर्समध्ये प्रचंड वाढ होण्याचे कारण सुमारे 5,000 कोटी रुपयांच्या ऑर्डर बुकला दिले जात आहे. कंपनीचा आयपीओ गेल्या वर्षी सप्टेंबर 2023 मध्ये 99 रुपयांच्या किमतीत आला होता, तेव्हापासून हा शेअर 228 टक्क्यांवर चढला आहे. ज्यामुळे सध्या या शेअरचे बाजार भांडवल सध्या 3,926.29 कोटी रुपये इतके आहे.
शेअर्समध्ये एक महिन्यापासून तेजी
गेल्या एका महिन्यात या स्मॉलकॅप सिव्हिल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअरच्या किमतीत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एप्रिलपासून आत्तापर्यंत 2024-25 या आर्थिक वर्षात शेअरने 149.90 रुपयांच्या पातळीवरून 116 टक्क्यांनी झेप घेतली आहे.
सातत्याने मोठ्या ऑर्डर्स
विष्णू प्रकाश आर पुंगलिया लिमिटेड ही कंपनी पायाभूत प्रकल्पांच्या अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) व्यवसायात सक्रिय आहे. कंपनी राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग, पूल, कल्व्हर्ट, उड्डाणपूल आणि रेल्वे ओव्हर-ब्रिजचे बांधकाम, विकास आणि देखभाल यात गुंतलेली आहे.
रस्ता प्रकल्पाची 160.86 कोटींची ऑर्डर
10 ऑक्टोबर 2024 रोजी, कंपनीने सांगितले की त्यांना DYCE-C-II-JP-Engineering, NWR, जयपूर राजस्थानच्या कार्यालयाकडून रस्ता प्रकल्पासाठी 160.86 कोटींची ऑर्डर मिळाली आहे. यापूर्वी 30 जून 2024 पर्यंत VPRPL कडे 4,915 कोटी रुपयांच्या थकबाकीदार ऑर्डर होत्या. VPRPL रेल्वे आणि रस्ते विभागांमध्ये विविधीकरणावर लक्ष केंद्रित करत आहे, ज्याचा वाटा अनुक्रमे 16 टक्के आणि 3 टक्के आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)