देशातून कुपोषण समुळ नष्ट होणार... ; मोदी सरकारने आणलीये 17,082 कोटींची 'ही' योजना!
देशातून कुपोषण समुळ नष्ट करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.९) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत १७,०८२ कोटी रुपयांच्या फोर्टिफाइड राइस योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे देशभरातील गरिब आणि गरजू व्यक्तींच्या आहारातील अशक्तपणा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दूर होण्यास मदत होणार आहे. या योजनेचा 100 टक्के वित्त पुरवठा हा केंद्र सरकार करणार आहे. लोह, फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बी 12 सारखी पोषक तत्वे फोर्टिफाइड राईसमधून सामान्यांना मिळणार आहेत.
काय आहे नेमकी ही योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 17,082 कोटी रुपये खर्चाच्या ॲनिमिया आणि पौष्टिक कमतरता दूर करण्यासाठी एका योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत फोर्टिफाइड राईसला प्रोत्साहन दिले जाणार आहे. या योजनेचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार आहे.
हे देखील वाचा – आरबीआयकडून कर्जदारांना मोठी भेट; …आता लोन बंद करण्यासाठी नाही द्यावे लागणार शुल्क!
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS-5) नुसार, 2019 ते 2021 दरम्यान ॲनिमिया ही भारतातील एक मोठी समस्या आहे. याचा परिणाम मुले, महिला आणि पुरुषांवर होतो. लोहाच्या कमतरतेशिवाय, इतर जीवनसत्त्वे आणि खनिजे जसे की व्हिटॅमिन बी 12 आणि फॉलिक ऍसिडची कमतरता देखील कायम आहे. याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर आणि उत्पादकतेवर होतो.
हे देखील वाचा – रेपो दराबाबत आरबीआयचा मोठा निर्णय, वाचा… तुमच्या कर्जावरील ईएमआय वाढणार की घटणार?
जगभरात सध्या अशक्तपणा आणि कुपोषणाचा सामना करण्यासाठी सामान्यांना अन्नपुरवठा करण्यावर देशभरातील सरकारे भर देत आहे. भारतातील ६५ टक्के नागरिक भात खातात. अशा परिस्थितीत तांदूळ हे पोषक तत्वांचा पुरवठा करण्यासाठी एक महत्वाचे माध्यम आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) ठरवलेल्या मानकांनुसार सामान्य भातामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये (आयर्न, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन बी12) समृद्ध असलेले फोर्टिफाइड राइस कर्नल जोडले जातात.