लग्न केल्यास काय होतो आयकर सवलतीचा फायदा
दररोज, देशभरातील लाखो लोक विवाह बंधनात अडकतात. स्वाभाविकच, खर्चही वेगाने वाढतो. जर मी असे म्हटले की लग्नात तुम्ही बक्कळ कर वाचवू शकता तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हो, तुम्ही बरोबर ऐकले. या ५ पद्धतींद्वारे तुम्ही तुमचा उत्पन्न कर वाचवू शकता. आपल्याकडे लग्न हा एक वेगळाच कार्यक्रम असतो आणि केवळ १ दिवसासाठी नाही तर अगदी आठवडाभर हा लग्नाचा कार्यक्रम सुरू असतो.
पुन्हा एकदा लग्नाचा हंगाम सुरू होणार आहे. तुम्ही तुमचा इन्कम टॅक्स कोणत्या ५ प्रकारे वाचवू शकता ते आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत. Income Tax वाचविण्यासाठी लग्न करा असं म्हटलं तर ते नक्कीच तुम्हाला हास्यास्पद वाटेल पण खरंच तुम्ही लग्न करून ५ प्रकारे तुमचा आयकर वाचवू शकता (फोटो सौजन्य – iStock)
गृह कर्जावरील फायदा
गृहकर्ज असल्यास काय होतो फायदा
स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि लग्न केल्यानंतर आपलं स्वतःचं घर असून संसार थाटावा असंही अनेकांचं स्वप्नं असतं. जेव्हा तुम्ही संयुक्त गृहकर्ज घेऊन जोडप्याने घर खरेदी करता तेव्हा तुम्हाला आयकरात सवलत मिळते. जर तुमचे संयुक्त गृहकर्ज ५०:५० असेल, तर कलम ८०सी अंतर्गत, गृहकर्जाच्या मूळ रकमेच्या देयकावर तुम्हाला दरवर्षी मिळणारी कर सूट १.५ लाख रुपयांवरून ३ लाख रुपयांपर्यंत वाढते.
मेडिकल वा हेल्थ इन्शुरन्स
आरोग्य विमा घेतल्यावर तुम्हाला आयकरात सवलत देखील मिळते. आयकर कायद्याच्या कलम 80D अंतर्गत, तुम्हाला जास्तीत जास्त 25,000 रुपयांपर्यंतच्या आरोग्य विम्याच्या प्रीमियम पेमेंटवर आयकरात सूट मिळते. जोडीदारांपैकी एक काम करत असताना तुम्हाला ही सूट मिळते. तसंच तुम्ही लग्न केल्यानंतर जोडीदारासह मेडिकल वा हेल्थ इन्शुरन्स काढत असाल तर त्यातही तुम्हाला अधिक सवलत मिळते आणि तुमचा कर वाचण्यास मदत मिळते
Budget 2025: ‘या’ विशेष कारणांमुळे यंदाचे बजेट सामान्यांच्या लक्षात राहणार
मुलांच्या शिक्षणावरील कर लाभ
मुलांच्या शिक्षणावर होतो खर्च
विवाहित जोडप्यांसाठी मुलांच्या शिक्षणावर आणखी एक कर लाभ उपलब्ध आहे. तुम्हाला कलम ८०(सी) अंतर्गत ही सूट देखील मिळते. जर तुम्ही दोघेही करदाते असाल. अशा परिस्थितीत, ही सूट ३ लाख रुपयांपर्यंत वाढते. मुलांच्या शाळेचा खर्च, त्यांच्या ट्युशनचे शुल्क आणि अन्य काही शुल्कांचे प्रमाणपत्र दाखवून तुम्ही करात सवलत मिळवू शकता
लीग ट्रॅव्ह अलाऊन्सवरील कर लाभ
जर तुम्ही आणि तुमचा जोडीदार दोघेही करदाते असाल. तसेच दोघेही काम करत आहात मग तुम्ही चार वर्षांच्या कालावधीत एकूण ८ टूर्सचा आनंद घेऊ शकता. मनोरंजक गोष्ट अशी आहे की तुम्ही यावर आयकर देखील वाचवू शकता. तुम्ही जर वर्षभरात योग्य खर्चाची आवक जावक दाखवू शकत असाल तर त्याचा तुम्हाला कर बचत करण्यास फायदा मिळतो
मालमत्तेवरील कर बचत
विविध मालमत्तेतील गुंतवणूक
जेव्हा तुम्ही एका मालमत्तेवरून दुसऱ्या मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार करता, मग जोडपे म्हणून तुम्ही यामध्ये आयकर सूटचा लाभ घेऊ शकता. जर तुम्ही वैयक्तिकरित्या दुसरी मालमत्ता खरेदी केली तर मग ते करपात्र बनते. त्याच वेळी, जर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या नावावर दुसरी मालमत्ता खरेदी केली असेल आणि त्याच्या/तिच्या नावावर आधीच कोणतीही गृहनिर्माण मालमत्ता नसेल तर मग तुम्ही त्यांना करदाते म्हणून दाखवून कर वाचवू शकता. आहे की नाही लग्न खऱ्या अर्थाने फायदेशीर? मग आता जास्त वेळ न दवडता लग्नाला नकार देणे थांबवा आणि कर वाचवा.
Budget 2025: 63 वर्ष जुना आयकर कायदा बदलणार? बजेटबाबत काय आहे निर्मलाताईंचा मास्टरप्लॅन