'हा' पेन्नी स्टॉक 5 शेअरवर 3 बोनस देणार, 17 जानेवारी 2025 ही असेल रेकॉर्ड डेट!
शेअर बाजारात शुक्रवारी (ता.3) मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स ७२०.६० अंकांनी घसरून, ७९,२२३.११ अंकांवर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी १८३.९० अंकांच्या घसरणीसह २४,००४.७५ अंकांवर बंद झाला आहे. मात्र, असे असले तरी किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय असलेल्या पेनी स्टॉक मयूख डीलट्रेड लिमिटेडने गुंतवणूकदारांसाठी नवीन वर्षात मोठे गिफ्ट दिले आहे.
5 शेअरवर 3 बोनस शेअर मोफत देणार
मयूख डीलट्रेड लिमिटेड ही कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक 5 शेअरवर 3 बोनस शेअर मोफत देणार आहे. सर्व शेअर 1 रुपयांच्या फेस व्हॅल्यूचे असतील. कंपनीने बोनस शेअरची रेकॉर्ड डेट 17 जानेवारी 2025 ही निश्चित केली आहे. या पेनी स्टॉकची किंमत 3 रुपयांपेक्षा पण कमी आहे. कंपनी गुंतवणूकदारांना 3:5 या प्रमाणात बोनस शेअर देणार आहे. त्यामुळे आता या कंपनीचे गुंतवणूकदार मालामाल होणार आहे.
काय करते ही कंपनी
कंपनीने बोनस शेयरसाठी रेकॉर्ड डेट 17 जानेवारी 2025 ही निश्चित केली आहे. कंपनीने याविषयीची माहिती शेअर बाजाराला दिली आहे. फाईलिंगनुसार, कंपनीने 31 डिसेंबर 2024 रोजी शेअर धारकांना बोनस शेअर देण्यास मंजूरी दिली आहे. मयूख डीलट्रेड लिमिटेड ही कंपनी मुख्यत्वेः पोर्टफोलिओ मॅनेजमेंट व्यवसायात सक्रिय आहे. कंपनीने यापूर्वी ऑक्टोबर 2024 मध्ये शेअरची फेसव्हॅल्यू 5 रुपयांनी कमी करून 1 रुपये करण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी कंपनीने शेअर 2:1 प्रमाणात स्प्लिट केला होता.
बाजार घसरणीतही ‘हा’ शेअर लागतोय अप्पर सर्किटला; 15 टक्क्यांच्या उसळीमुळे गुंतवणूकदार सुखावले!
गुंतवणूकदारांना मिळणार अतिरिक्त लाभ
बोनस शेअरमध्ये कंपन्या त्यांच्या शेअरधारकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता अतिरिक्त शेअर वाटप करतात. त्याचा परिणाम कंपनीच्या बाजारातील मूल्यांकनावर होत नाही. तर बोनस शेअरची किंमत बोनसच्या प्रमाणात बदलते. यामध्ये गुंतवणूकदारांना अतिरिक्त लाभ मिळतो. तर शेअर बाजारात तरलता वाढते.
सर्वात महागडा स्टॉक
एल्सिड इन्वेस्टमेंट्सने 29 ऑक्टोबर रोजी जवळपास 67 हजार टक्क्यांची अचानक उसळी घेतली. कंपनीचा शेअर 29 ऑक्टोबर रोजी एकाच दिवसात 3.53 रुपयांहून वधारून 2,36,250 रुपयांवर पोहचला. सध्या हा स्टॉक 1,82,999.40 रुपयांवर आहे. या नवीन अपडेटमुळे एल्सिड इन्वहेस्टमेंटचा शेअर भारतीय बाजारातील सर्वात महागडा स्टॉक ठरला आहे. बीएसई आणि एनएसईवर आयोजित एका स्पेशल कॉल ऑक्शनमुळे ही तेजी आल्याचे दिसून आले आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)