Samsung TV युजर्ससाठी खूशखबर! सॅमसंग टीव्ही प्लसचा टॉप क्रिएटर्ससोबत करार
७१ दशलक्षहून अधिक सबस्क्रायबर्ससह माजी नासा अभियंता, नवप्रवर्तक, शिक्षणतज्ञ आणि सर्वात प्रभावी क्रिएटर मार्क रॉबर जगभरातील टेलिव्हिजन प्रेक्षकांसाठी त्यांच्या विज्ञान, सर्जनशीलता व उत्साहाचे सिग्नेचर संयोजन देतात. ‘माझा नेहमी विश्वास आहे की, विज्ञान व अभियांत्रिकी जिज्ञासूवृत्ती आणि सर्जनशीलतेसाठी फक्त फॅन्सी शब्द आहेत,” असे मार्क रॉबर म्हणाले. ”हे चॅनेल जगभरातील अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत त्या उत्साहाचा प्रसार करते. तसेच अध्ययनाला धमाल करते, ज्यामुळे तुम्हाला काहीतरी वेगळे करावेसे वाटते.”
क्रिएटर चॅनेल्सची ही नवीन श्रेणी स्ट्रीमिंग सेवेवर शैलीला परिभाषित करणाऱ्या आवाजांची नवीन लाट आणते, ज्यामध्ये मिशेल खरे यांचे चॅलेंज अॅसेप्टेड, एपिक गार्डनिंग टीव्ही, द ट्राय गाईज, ब्रेव्ह वाइल्डरनेस आणि द सोनी गर्ल्स टीव्हीचा समावेश आहे. हा अद्वितीय कन्टेन्ट करार सॅमसंग टीव्ही प्लसच्या व्यापक, जागतिक विस्तारीकरणाचा भाग आहे, जेथे ते जागतिक दर्जाच्या क्रिएटर्ससाठी प्रीमियम गंतव्य म्हणून टेलिव्हिजनच्या नवीन युगाला आकार देत आहेत आणि घरामध्ये मोठ्या स्क्रिनवर पाहिल्या जाणाऱ्या मनोरंजनाच्या स्तराला नव्या उंचीवर घेऊन जात आहेत.
”मार्क रॉबर यांच्या विज्ञान, सर्जनशीलता व जिज्ञासूवृत्तीच्या संयोजनाने जगभरातील लाखो व्यक्तींना प्रेरित केले आहे,” असे सॅमसंग टीव्ही प्लसचे वरिष्ठ उपाध्यक्ष व जागतिक प्रमुख सालेक ब्रोडस्की म्हणाले. ”आमच्या वाढत्या क्रिएटर रोस्टरचा भाग म्हणून मार्क रॉबर टीव्ही पिढ्यांना एकत्र आणणाऱ्या आश्चर्याची सामायिक भावना सादर करते. आम्हाला मार्क यांचे स्वागत करण्याचा आणि सॅमसंग टीव्ही प्लसच्या माध्यमातून आमच्या क्रिएटर्सची व्यापक श्रेणी जगभरातील अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आनंद होत आहे”, अशी माहिती देण्यात आली.






