आजचे शेअर मार्केट
सोमवारी जगभरातील शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती पण मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. आशियाई बाजारातील तेजीमुळे देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवातही चांगली झाली आहे. BSE सेन्सेक्स 1000 अंकांच्या वाढीसह उघडला तर निफ्टी देखील 24,300 अंकांच्या वर उघडला आहे.
विशेषत: ऑटो, मेटल, एनर्जी आणि IT शेअर्सने वेग घेतला आहे. या वाढीसह, BSE सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 6.75 लाख कोटी रुपयांनी वाढून 448.59 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. टाटा मोटर्स आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्सची सुरुवात आणि करण्यात आलेल्या व्यवहारात सुमारे चार टक्क्यांनी वाढ झाल्याची दिसून येत आहे. (फोटो सौजन्य – iStock)
सर्वाधिक शेअर्समध्ये वाढ
टाटा मोटर्स, लार्सन अँड टुब्रो आणि ओएनजीसीचे शेअर्स NSE वर सर्वाधिक वाढले आहेत तर एसबीआय लाईफ, अपोलो हॉस्पिटल्स आणि नेस्ले इंडियाचे शेअर्स घसरले आहेत. टाटा मोटर्स, अदानी पोर्ट्स आणि लार्सन अँड टुब्रो यांनी बीएसईवर सर्वाधिक तर मारुती, टाटा स्टील आणि जेएसडब्ल्यू दोन टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.
हेदेखील वाचा – ‘ही’ इथेनॉल कंपनी आणणार 1,000 कोटींचा आयपीओ; पैसे तयार ठेवा, गुंतवणुकीची मोठी संधी!
1000 हून अधिक अंकांनी वाढ
शेअर्सची उसळी
गेल्या सत्रात सेन्सेक्स 78,759.40 अंकांवर बंद झाला होता आणि आज तो 78,981.97 अंकांवर उघडला. सुरुवातीच्या व्यापारात तो 1000 हून अधिक अंकांनी वाढून 79,852.08 अंकांवर पोहोचला. दुसरीकडे, निफ्टी 24,189.85 अंकांवर उघडला. गेल्या सत्रात तो 24,055.60 अंकांवर बंद झाला होता. सुरुवातीच्या व्यापारात तो एक टक्क्यांहून अधिक वाढून 24,382.60 अंकांवर पोहोचला.
शेअर्सचा व्यवहार
सेन्सेक्समधील सर्व 30 शेअर्स हे जलद वाढत आहे आहेत. बेंचमार्क निर्देशांकांसोबत, व्यापक बाजारांमध्येही तेजीचा कल दिसून येत आहे. मिडकॅप इंडेक्स 1.86 टक्क्यांनी तर स्मॉलकॅप इंडेक्स 2.10 टक्क्यांनी वाढला आहे. सर्व क्षेत्रीय निर्देशांक हे वाढत असल्याचे दिसून येत आहेत. निफ्टी रियल्टी, निफ्टी मेटल, निफ्टी मीडिया आणि निफ्टी आयटीने सर्वाधिक वाढ केली आहे. सोमवारी मोठ्या घसरणीनंतर, बाजारातील चढउतारांची कल्पना देणारा India VIX देखील 13% पेक्षा जास्त घसरून 17.7 वर आला.
हेदेखील वाचा – गौतम अदानींनंतर कोण सांभाळणार अदानी समूहाचा गाडा; ठरलेत ‘हे’ चार वारसदार!
परदेशातील स्टॉक मार्केटची स्थिती
आशिया-पॅसिफिकमधील शेअर बाजारातही वाढ झाली आहे. सोमवारी जपानच्या निक्केई 225 मध्ये ऐतिहासिक घसरण झाली होती परंतु आज 9.87 टक्क्यांनी उसळी घेतली आहे. त्याचप्रमाणे ब्रॉड बेस्ट टॉपिक्समध्ये 9.95 टक्के वाढ झाली आहे. गेल्या सत्रात हे दोन्ही निर्देशांक 12 टक्क्यांनी घसरले होते, जी 1987 नंतरची जपानच्या शेअर बाजारातील सर्वात मोठी घसरण होती. ऑस्ट्रेलियाचा S&P/ASX 200 इंडेक्स देखील 0.65 टक्क्यांनी जास्त आहे. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक 4.92 टक्के आणि कोस्डॅक निर्देशांक 6.60 टक्के आणि हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक 1.09 टक्क्यांनी वधारला. सोमवारी अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.