Web3 टॅलेंट तयार करण्यासाठी शार्डियमचे मोठा पाऊल (photo-social media)
Web3 Education Update: भारतात Web3 टॅलेंट समूहाला गती देण्याच्या दिशेने वाटचाल करत शार्डियमने आयटीएम नवी मुंबईसोबत सामंजस्य करारावर (MOU) स्वाक्षरी केली आहे, ज्या अंतर्गत महाराष्ट्रात ब्लॉकचेन शिक्षण आणि प्रत्यक्ष बिल्डर प्रशिक्षण देण्यात येईल. हा सहयोग आयटीएम येथे वर्षभर हायब्रिड लर्निंग प्रोग्रामच्या माध्यामातून विद्यार्थ्यांना Web3 व ब्लॉकचेन शिक्षण, कौशल्ये व बिल्डर क्रियाकलापाचे ज्ञान मिळण्याला चालना देईल. हा सहयोग महाराष्ट्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञान व ब्लॉकचेन नाविन्यतेप्रती वाढत्या गतीशी संलग्न आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग कौशल्याचा अनुभव देत या उपक्रमाचा भारतातील विकेंद्रीकृत डिजिटल क्षेत्राला आकार देण्याची क्षमता असलेला प्रबळ, भविष्याकरिता सुसज्ज टॅलेंट समूह घडवण्याचा मनसुबा आहे.
या सामंजस्य कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना टेक्निकल वर्कशॉप्स, वॉलेट ऑनबोर्डिंग, मार्गदर्शक विकास सत्रे, संकल्पनांना वाव आणि शार्डियमच्या परिसंस्था तज्ञांकडून मार्गदर्शन मिळेल. हा सहयोग Web3 क्लब्स, हॅकेथॉन्स, को-ब्रॅण्डेड सामुदायिक इव्हेण्ट्ससाठी साह्य करेल. तसेच इंटर्नशिप्स व वास्तविक विश्वातील प्रकल्पांप्रती योगदानासाठी संधी देईल. विद्यार्थी समूहांना अधिक प्रमाणात उपलब्धतेसह त्यांच्या अधिकाधिक सहभागाच्या खात्रीसाठी ऑनलाइन व ऑफलाइन सहभागांचे नियोजन देखील करण्यात येईल.
”भारतातील Web3 नाविन्यतेच्या भावी वाटचालीला तरूण बिल्डर्स चालना देतील, ज्यांना विकेंद्रिकृत तंत्रज्ञान वास्तविक विश्वामधील आव्हानांचे निराकरण करू शकण्याबाबत ज्ञान असेल. आयटीएमसोबत आमचा सहयोग विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव, मार्गदर्शन व संधींसह शार्डियमवर अर्थपूर्ण उपयोजन निर्माण करण्यास सक्षम करेल. अधिकाधिक विद्यार्थ्यांना ऑन-चेनबाबत प्रयोग करण्यासाठी मदत करत आम्ही भारतात ऑन-चेन अवलंबनाला गती देऊ शकतो, जे खुली, स्थिर आणि नाविन्यता-केंद्रित डिजिटल अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने प्रमुख पाऊल आहे. या मोहिमेमध्ये अधिकाधिक विद्यार्थी, डेव्हलपर्स व संस्था सहभाग घेत असताना आम्ही प्रबळ राष्ट्रीय परिसंस्था निर्माण करण्याच्या जवळ पोहोचत आहोत, जेथे स्वदेशी संकल्पना जागतिक स्तरावर प्रगती करू शकतात आणि भारताच्या विकेंद्रिकृत इंटरनेटमधील नेतृत्वाप्रती योगदान देऊ शकतात,” असे शार्डियमचे सह-संस्थापक निश्चल शेट्टी म्हणाले.
शार्डियमच्या प्रूफ ऑफ कम्युनिटी प्रोग्रामचा भाग इंडिया ऑनचेन टूरने आधीच भारतातील ८५ शहरांमध्ये व १०० हून अधिक कॉलेजमध्ये तर ३०० हून अधिक शैक्षणिक वर्कशॉप्स आणि मीटअप्सचे आयोजन केले आहे, ज्यांचा २०,००० हून अधिक विद्यार्थी व श्रमजीवी व्यावसायिकांना फायदा झाला आहे.
ही देशव्यापी मोहिम भारतातील व्यक्तींना ऑन-चेनच्या दिशेने वाटचाल करण्यास आणि Web3 सोप्या व सहजसाध्य स्वरूपात समजण्यास मदत करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. कॅम्पसेस व शहरांमध्ये वर्कशॉप्स, मीटअप्स व मिनी-आडियेथॉन्स राबवत ही टूर विद्यार्थी, डेव्हलपर्स व क्रिएटर्सना एकत्र आणते, जेथे ते ऑन-चेन कृतीसह ज्ञान अवगत करू शकतात व प्रयोग करू शकतात. तसेच प्रकल्प निर्माण करू शकतात आणि वाढत्या शार्डियम समुदायामध्ये सामील होऊ शकतात.






