5 दिवसांत गुंतवणूकदारांचे 18 लाख कोटी बुडाले; वाचा... वर्षाअखेर कसा राहील शेअर बाजाराचा मुड!
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजाराची उच्चांकी वाटचाल सुरु होती. त्यास ब्रेक लागला असून, सोमवारी (ता.३०) शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 1272 अंकांच्या घसरणीसह 84,299 अंकांवर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 368 अंकांच्या घसरणीसह 25,811 अंकांवर बंद झाला आहे. त्यामुळे आज शेअर बाजारात गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने बँकिंग-ऑटो क्षेत्रातील समभाग आणि शेअर बाजारातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या शेअर्सना मोठा फटका बसल्याने शेअर बाजारात ही घसरण दिसून आली आहे.
कोणते शेअर्स तेजीत, कोणत्या शेअर्समध्ये घसरण
शेअर बाजारात आज (ता.३०) मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 5 समभाग वाढीसह तर 25 समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. वाढत्या समभागांमध्ये जेएसडब्लू स्टील 2.86 टक्क्यांच्या वाढीसह, एनटीपीसी 1.27 टक्क्यांच्या वाढीसह, टाटा स्टील 1.17 टक्क्यांच्या वाढीसह, टायटन 0.41 टक्क्यांनी, एशियन पेंट्स 0.22 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तर रिलायन्सचा शेअर ३.२३ टक्के, ॲक्सिस बँक ३.१२ टक्के, आयसीआयसीआय बँक २.५८ टक्के, नेस्ले २.१२ टक्के, टेक महिंद्रा २.१० टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा २.०३ टक्के, मारुती सुझुकीचा शेअर १.९९ टक्के घसरणीसह बंद झाला आहे.
गुंतवणूकदारांचे ३.७० लाख कोटी रुपयांचे नुकसान
सोमवारी झालेल्या शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. बीएसईवर सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप घसरून 474.25 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे. जे मागील सत्रात 477.93 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे तब्बल 3.68 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
बँकिंग शेअर्समध्ये सर्वाधिक प्रॉफिट बुकींग
दरम्यान, आज शेअर बाजारात सर्वाधिक प्रॉफिट बुकींग बँकिंग शेअर्समध्ये दिसून आली आहे. बँक निफ्टीही 857 अंकांनी घसरून बंद झाला आहे. याशिवाय ऑटो आणि आयटी समभागातही घसरण झाली आहे. फार्मा, एफएमसीजी, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, ऑइल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्समध्येही विक्री झाली. केवळ धातू आणि मीडिया समभाग वाढीसह बंद झाले. आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही घसरण दिसून आली आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)