चार दिवसांच्या दीर्घ सुट्टीनंतर आज सोमवारी शेअर बाजार (Share Market) पुन्हा एकदा सुरू झाला. मात्र शेअर बाजार सुरू होताच पहिल्याच सत्रात गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. शेअर मार्केटमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाली. सेन्सेक्स (Sensex) तब्बल १,१०० अंकांनी घसरला तर दुसरीकडे निफ्टीमध्ये (Nifty) देखील तब्बल २८१ अंकांची घसरण पाहायला मिळाली.
सेन्सेक्स १ हजार १०० अंकांच्या घसरणीसह ५७,१०९ अंकांवर पोहोचला तर निफ्टी २८१ अंकाच्या घसरणीसह १७,१९४ अंकांवर पोहोचल्याची माहिती मिळाली आहे. शेअर बाजार गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार असा चार दिवस बंद होता. चार दिवसांनंतर आज शेअर बाजार सुरू होताच शेअर बाजरात गुंतवणूकदारांना तेजीची अपेक्षा होती. मात्र सेन्सेक्समध्ये झालेल्या घसरणीने गुंतवणूकदरांच्या या अपेक्षेवर पाणी फिरवले आहे.
[read_also content=”किरकोळ बाजारानंतर होलसेल बाजारातही महागाईच्या दराने गाठला उच्चांक, सर्वसामान्यांचे हाल https://www.navarashtra.com/india/after-retail-market-inflation-rate-is-increasing-in-wholesale-market-nrsr-270459.html”]
सोमवारी शेअर बाजार सुरू होताच मोठी उलथापालथ झाली. विक्रीचा दबाव वाढल्याने सेन्सेक्स पहिल्याच सत्रामध्ये १ हजार १०० अंकांनी घसरला. तर निफ्टीमध्ये देखील २८१ अंकांची घसरण झाली. पहिल्याच सत्रामध्ये शेअर बाजार कोसळल्याने गुंतवणूंकदारांची निराशा झाली. कोट्यवधीचा फटका बसला. आज हेवीवेट, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, टीसीएस, रिलायन्स आणि आयसीआयसीआयच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली, सध्या सेन्सेक्स १,२३० अंकांच्या घसरणीसह ५७,१०९ अंकांवर कारभार करत आहे.
सोमवारी शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली, शेअर बाजारावर विक्रीचा दबाव वाढल्यामुळे पहिल्याच सत्रामध्ये सेन्सेक्स १ हजार १०० अंकांनी कोसळला तर निफ्टी देखील २८१ अंकांनी घसरली. त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. गुंतवणूकदारांना तब्बल ३.८० लाख कोटींचा फटका बसला आहे. एकट्या इन्फोसिसच्या शेअरमधील गुंतवणूकदारांचे ४० हजार कोटी रुपये बुडाले आहेत.