Share Market Today: गुंतवणूकदारांनो! टाटा केमिकल्ससह आज खरेदी करा हे महत्त्वाचे स्टॉक्स, बदलू शकतं तुमचं नशिब
जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे आज १३ ऑगस्ट रोजी, बुधवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह किंवा सपाट पातळीवर सुरु होती. मात्र अखेर या घसरणीला आज ब्रेक लागणार आहे. आज असा अंदाज वर्तवला जात आहे की, शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक पातळीवर होण्याची अपेक्षा आहे.
गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी मजबूत आणि सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २४,६१९ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ६४ अंकांनी जास्त होता. मंगळवारी, शेअर बाजार पुन्हा घसरणीचा मार्ग स्वीकारत खाली आला. सेन्सेक्स आणि निफ्टी देखील घसरले. सेन्सेक्स ३६८.४९ अंकांनी म्हणजेच ०.४६% ने घसरून ८०,२३५.५९ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ९७.६५ अंकांनी म्हणजेच ०.४०% ने घसरून २४,४८७.४० वर बंद झाला. मंगळवारी बँक निफ्टी निर्देशांक ४६७.०५ अंकांनी किंवा ०.८४% ने घसरून ५५,०४३.७० वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
आजच्या व्यवहारात भारत पेट्रोलियम, आयआरसीटीसी, आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल, फर्स्टक्राय, ज्युबिलंट फूडवर्क्स, एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स (न्याका), अपोलो हॉस्पिटल्स, कोचीन शिपयार्ड, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, व्होडाफोन आयडिया, एनएमडीसी, सुझलॉन एनर्जी, रेडिको खैतान, ऑइल इंडिया गुंतवणूकदार या स्टॉक्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.
आज खरेदी करायच्या स्टॉकबाबत चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आठ इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये कारट्रेड टेक लिमिटेड, झोटा हेल्थ केअर लिमिटेड, अव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड, टाटा केमिकल्स लिमिटेड, बायोकॉन लिमिटेड, गॅब्रिएल इंडिया लिमिटेड, ग्रेफाइट इंडिया लिमिटेड आणि लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स लिमिटेड यांचा समावेश आहे.
रिचार्जशिवाय किती दिवस चालू राहतं SIM कार्ड? काय सांगतात TRAI चे नियम, जाणून घ्या सविस्तर
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, विप्रो आणि इन्फोसिस सारख्या प्रमुख टेक कंपन्या तसेच एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या बँकिंग दिग्गजांनी ३० जून २०२५ रोजी संपणाऱ्या तिमाहीचे त्यांचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. १३ ऑगस्ट २०२५ रोजी, भारत पेट्रोलियम (BPCL), मुथूट फायनान्स आणि IRCTC यासह ५०० हून अधिक कंपन्या तिमाही उत्पन्न जाहीर करणार आहेत.
प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांसाठी तीन स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये आर्चियन केमिकल इंडस्ट्रीज, डीसीबी बँक आणि हबटाऊन यांचा समावेश आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांसाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये टिबो टेक, वोक्हार्ट, हबटाउन, अॅक्मी सोलर होल्डिंग्ज आणि डिफ्यूजन इंजिनिअर्स यांचा समावेश आहे.