(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हॅल्युएशन, बर्न रेट आणि ईबीआयटीडीए यांसारखे शब्द रोजच्या संभाषणाचा भाग बनले आहेत, अशा काळात हा उपक्रम साधा, पण अत्यंत समर्पक प्रश्न विचारतो: उद्योजकतेच्या या भाषेने मूळ व्यवसायालाच मागे टाकण्यास सुरुवात केली आहे का? विनोद आणि संस्कृतीच्या सूक्ष्म निरीक्षणाद्वारे #DontBeATota महत्त्वाकांक्षी उद्योजकांना आठवण करून देतो की, यशस्वी व्यवसाय हे केवळ स्टार्टअपच्या फॅशनेबल शब्दांवर (जार्गन) उत्तम पकड असल्यामुळे नाही, तर दृढ विश्वास, अंमलबजावणी, स्थिरता आणि व्यवसायाच्या मुलभूत गोष्टींच्या सखोल आकलनातून उभे राहतात.
या उपक्रमाच्या केंद्रस्थानी तोता (पोपट) हा एक चतुर मॅस्कॉट आहे, ज्याचा विश्वास आहे की, स्टार्टअपच्या संज्ञा आत्मविश्वासाने घोकून दाखवणे हे शार्कना प्रभावित करण्यासाठी पुरेसे आहे. ज्या शब्दांचा अर्थ कदाचित त्याला स्वतःलाही नीट माहीत नाही, अशा फॅशनेबल शब्दांनी सज्ज असलेला तोता या गैरसमजाचे प्रतिनिधीत्व करतो की, उद्योजकासारखे बोलणे म्हणजेच उद्योजक असणे होय. पण, शार्कचा सामना करण्याची वेळ येते, तेव्हा केवळ अशा शब्दांमुळे काम होत नाही. या खोडकर पात्राच्या माध्यमातून हा उपक्रम एक साधे सत्य समोर आणतो: स्टार्टअपची भाषा कोणीही तोंडपाठ करू शकते, पण आपला व्यवसाय खऱ्या अर्थाने समजतो, केवळ तेच संस्थापक व्यवसाय उभा करू शकतात.
गेल्या पाच सीझनमध्ये, शार्क टँक इंडियाने उद्योजकतेला मुख्य प्रवाहातील संभाषणांमध्ये आणण्यास मदत केली आहे, ज्यामुळे देशभरातील संस्थापकांना त्यांच्या संकल्पना मांडण्यासाठी, गुंतवणूक मिळवण्यासाठी आणि शाश्वत व्यवसाय उभे करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. हा नवीन उपक्रम सर्व स्तरांतील उद्योजकांचा गौरव करून त्या वारशाला पुढे नेतो, ज्यांनी वर्षानुवर्षे वास्तविक समस्या सोडवण्यात, आपल्या ग्राहकांना समजून घेण्यात आणि अगदी शून्यातून व्यवसाय उभा करण्यात अथक मेहनत घेतली आहे.
द स्क्रिप्ट रूमद्वारे संकल्पित आणि निर्मित करण्यात आलेली #DontBeATota मोहीम स्पष्टता, दृढ विश्वास आणि ठोस पाया असलेल्या संस्थापकांना पुढे येण्याचे आवाहन करते. मग ते पहिल्यांदाच उद्योजक बनलेले असोत किंवा अनुभवी व्यावसायिक असोत, शार्क अशा व्यक्तींच्या शोधात आहेत, ज्यांना आपला व्यवसाय सखोलपणे माहित आहे, ज्यांची स्वतःची एक गाथा आहे आणि ज्यांच्यामध्ये सातत्याने पुढे जाण्याची जिद्द आहे.
अमन गुप्ता, boAt चे सह-संस्थापक आणि ऑफ/बीटचे (OFF/BEAT) संस्थापक यांनी स्पष्ट केलं की, “स्टार्टअप बझवर्ड्स पुन्हा-पुन्हा बोलून व्यवसाय उभा राहिला असता, तर आपण सर्वांनी पोपटांमध्ये गुंतवणूक केली असती. याच विचारातून ही मोहीम आकाराला आली आहे. गेल्या काही वर्षांत शार्क टँक इंडियाने उद्योजकतेला मुख्य प्रवाहातील संभाषणांचा भाग बनवण्यास मदत केली आहे आणि या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान आहे. पण, कंपनी उभी करणे म्हणजे केवळ उद्योजकासारखे बोलणे कधीच नव्हते, तर वास्तविक समस्या सोडवणे, तुमचा व्यवसाय सखोलपणे समजून घेणे आणि दररोज व्यवसाय पुढे नेत राहण्याची जिद्द दाखवणे यांबद्दल आहे. सीझन ६ मध्ये आम्ही अगदी अशाच प्रकारच्या संस्थापकांना भेटण्यास उत्सुक आहोत.”
शार्क टँक इंडिया सीझन ६ साठी नोंदणी सध्या सोनी लिव्हवर सुरू आहे. प्रबळ व्यवसाय, दृढ विश्वास आणि आपण कोणता व्यवसाय उभारत आहोत याची स्पष्ट समज असलेले संस्थापक शार्कसमोर सादरीकरण करण्याची संधी मिळवण्यासाठी आताच नोंदणी करू शकतात. शार्क टँक इंडिया सीझन ६ लाहोरी जिरा आणि लॉरियल पॅरिस यांच्याद्वारे सह-प्रायोजित आहे, तर व्हाईट गोल्ड आणि लाल स्वीट्स भागीदार आहेत.






