Snap India जागतिक स्थरावर AR Lens आकडेवारीसह अग्रस्थानी
भारतात स्नॅपचॅटवर सर्वाधिक लेन्स तयार केले जातात, जिथे वापरकर्ते महिन्यातून 80 अब्ज वेळा लेन्स वापरतात. म्हणूनच तर आता AR Lens आकडेवारीसह कंपनी अग्रस्थानी आहे.
स्नॅप इन्क.ने मुंबईत आयोजित केलेल्या दुसऱ्या वार्षिक इंडिया एआर डे इव्हेण्टमध्ये ऑगमेण्टेड रिअॅलिटी (एआर) च्या परिवर्तनात्मक क्षमतेला उजागर केले. या इव्हेण्टमध्ये एआरच्या भविष्यातील दृष्टिकोनावर चर्चा झाली, तसेच भारतातील डेव्हपलर समुदायाचा समावेश असलेला एक प्रगतीशील एकोसिस्टम तयार करण्यात कंपनीने केलेल्या योगदानावर भर देण्यात आला.
स्नॅप इन्क.चे सीटीओ बॉबी मर्फी यांनी कंपनीच्या सर्जनशीलतेला चालना देणाऱ्या एआर इनोव्हेशनवरील कटीबद्धतेबद्दल सांगितले. ते म्हणाले, “स्नॅप एआरसोबत सर्जनशीलतेसाठी एक प्लॅटफॉर्म तयार करत आहे. भारतातील डेव्हपलर्स नाविन्येतेत अग्रस्थानी असून, ते सर्वसमावेशक व सर्जनशील अनुभव निर्माण करत आहेत.”
3 सरकारी बँक विकणार आपला हिस्सा, 20% हिस्सा विकण्याची झाली तयारी, यादीत कोणत्या बँकेचे नाव
स्नॅप इन्क.चे भारतातील व्यवस्थापकीय संचालक पुलकित त्रिवेदी यांनी भारतातील २०० दशलक्ष स्नॅपचॅटर्ससाठी एआर संवाद आणि सर्जनशीलता एक महत्त्वाचे साधन बनल्याचे सांगितले. स्नॅपच्या एआर टूल्सचा वापर करीत क्रिएटर्स, डेव्हपलर्स आणि ब्रँड्स यांच्यात संवाद साधला जातो.
इव्हेण्टमध्ये स्नॅपच्या फिफ्थ-जनरेशन सी-थ्रू एआर ग्लासेस् स्पेक्टॅकल्स भारतात पहिल्यांदाच प्रदर्शित करण्यात आले. हे ग्लासेस स्नॅप ओएसच्या मदतीने पूर्णत: नवीन पद्धतीने एआर अनुभव देतात. यामध्ये इनडोअर आणि आउटडोअर वापरासाठी सी-थ्रू डिस्प्ले आणि बिल्ट-इन डिमर आहे.
Inflation Rate: महागाईपासून सामान्यांना दिलासा…! जानेवारीमध्ये ‘या’ वस्तूंच्या किमती झाल्या कमी
भारतात एआर क्रिएटर्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. जगभरातील ३७५,००० हून अधिक क्रिएटर्सनी ४ दशलक्षाहून अधिक एआर लेन्सेस डिझाइन केले आहेत. भारतामधील विशेषत: दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमधून एआर डेव्हपलर्सची संख्या वाढत आहे. स्नॅपने शैक्षणिक संस्थांसोबत सहयोग करत तरूण टॅलेंटला सर्जनशील डिजिटल कौशल्यांमध्ये प्रशिक्षीत केले आहे.
स्नॅपने इंडिया लेन्स अवॉर्ड्सची देखील घोषणा केली. या पुरस्कारामधून पाच श्रेणींतील सर्वोत्कृष्ट एआर लेन्स क्रिएटर्सला सन्मानित करण्यात आले. यामध्ये सर्वात जास्त व्हायरल लेन्स, गेम, आर्टिस्टिक, टेक्निकल, आणि फेस्टिवल लेन्स यांचा समावेश आहे.
ब्रँड्ससाठी एआर च्या वापरामुळे नवीन अनुभव निर्माण होत आहेत. स्नॅपने ब्रँड्सला प्रेक्षकांशी अधिक चांगल्या पद्धतीने कनेक्ट होण्यास मदत केली आहे. एआरचा उपयोग प्रॉडक्ट सादरीकरण, ग्राहक सहभाग आणि डिजिटल अनुभवांसाठी वाढत आहे.
इंडिया एआर डे इव्हेण्ट भारतातील एआर भविष्याची दिशा स्पष्ट करत आहे, जेथे क्रिएटर्स, डेव्हपलर्स आणि ब्रँड्ससाठी नाविन्यता आणि सर्जनशीलतेला चालना मिळत आहे.