आजचे स्टॉक मार्केट (फोटो सौजन्य - iStock)
सोमवारी अर्थात 13 जानेवरी रोजी देशांतर्गत शेअर बाजारात मोठ्या घसरणीने व्यापारी आठवड्याची सुरुवात झाली असल्याचे दिसून आले आहे. सेन्सेक्स सुमारे 800 अंकांनी घसरून उघडला. निफ्टी देखील 225 अंकांच्या घसरणीसह उघडला. बँक निफ्टी 460 अंकांनी घसरला होता. मिडकॅप निर्देशांक 800 अंकांनी घसरला होता.
मागील बंदच्या तुलनेत, सेन्सेक्स सुरुवातीच्या काळात 749अंकांनी घसरला आणि 76,629 वर उघडला. निफ्टी 236अंकांनी घसरून 23,195 वर उघडला. बँक निफ्टी 470 अंकांनी घसरून 48,264 वर उघडला आणि चलन बाजारात रुपया 24 पैशांनी कमकुवत होऊन $ 82.21 वर उघडला, जो त्याचा नवीन विक्रमी नीचांक आहे. इतकंच नाही तर निफ्टीचे सर्व निर्देशांक लाल रंगात होते. रिअल्टी शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली. धातू, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, वाहन, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली असल्याचेही सध्या दिसून येत आहे.
सर्व शेअर्समध्ये घसरण
इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक वगळता निफ्टीवरील इतर सर्व शेअर्समध्ये घसरण झाली. बीपीसीएल, पॉवर ग्रिड, अपोलो हॉस्पिटल, एम अँड एम, बीईएल सारख्या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले. बीएसई सेन्सेक्सवरही, इंडसइंड, अॅक्सिस बँक आणि टीसीएस हिरव्या चिन्हावर होते. परंतु एशियन पेंट, टाटा स्टील, बजाज फायनान्स, अदानी पोर्ट्स, एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली.
आता फक्त 250 रुपयात चालू करता येणार SIP, लवकरच लागू होणार नियम
घसरणीसह व्यवहार सुरू
जागतिक बाजार आणि निफ्टी सकाळीच भारतीय शेअर बाजारात मोठ्या घसरणीसह व्यवहार सुरू झाल्याचे संकेत देत होते. शुक्रवारीच अमेरिकन बाजारात मोठी घसरण झाली. आज सकाळी गिफ्ट निफ्टी 188 अंकांनी घसरला. अशा परिस्थितीत, संस्थात्मक गुंतवणूकदार देखील उदासीन दिसत आहेत. शुक्रवारी झालेल्या घसरणीत, FIIs ने रोख, निर्देशांक आणि स्टॉक फ्युचर्समध्ये एकत्रितपणे 7100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शेअर्स विकले, तर देशांतर्गत फंडांनी सलग 18 व्या दिवशी सुमारे 4000 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. प्री-ओपनिंगमध्ये मोठी घट होऊन उघडण्याचे संकेत होते.
जागतिक बाजारपेठेतील अपडेट्स
रोजगाराच्या चांगल्या आकडेवारीनंतर व्याजदर कपातीची आशा धुळीस मिळाल्याने शुक्रवारी अमेरिकन बाजार कोसळले. डाऊ जवळजवळ ७०० अंकांनी घसरला, तर नॅस्डॅक 320 अंकांनी घसरला. गिफ्ट निफ्टी 188 अंकांनी घसरून 23312 च्या जवळ आला. डाऊ फ्युचर्स सपाट होते तर आज जपानी बाजारपेठांमध्ये सुट्टी आहे. डिसेंबरमध्ये अमेरिकेत नवीन नोकऱ्यांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढली, त्यामुळे बेरोजगारीचा दर कमी झाला आहे. फेड पॉलिसीमध्ये दर कपातीची शक्यता मे पर्यंत संपली.
कमोडिटी आणि चलन बाजारात मोठी उलाढाल
अमेरिकेत 10 वर्षांच्या बाँड उत्पन्नाने 15 महिन्यांच्या उच्चांकी पातळी सुमारे 4.8% वर पोहोचले, तर डॉलर निर्देशांक २६ महिन्यांत प्रथमच 109.50 च्या वर पोहोचला. अमेरिकेने रशियावर कडक कारवाई केल्यामुळे, कच्च्या तेलाचा दर साडेचार महिन्यांच्या उच्चांकावर $81 वर पोहोचला होता. शुक्रवारपासून, किमती सुमारे 6% ने वाढल्या आहेत. सोन्याचा भाव एका टक्क्याने वाढून सलग चौथ्या दिवशी $2720 च्या जवळ आहे तर चांदीचा भाव सलग सातव्या दिवशी $31.50 च्या जवळ आहे.
Budget 2025: कमीत कमी 7500 रूपये पेन्शनसह महागाई भत्ता, बजेटची झोळी उघडणार का निर्मला सीतारमण
आजच्या बाजारासाठी महत्त्वाचे ट्रिगर