शेअर बाजारात मोठी आपटी; एकच दिवसात गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी रुपयांचे नुकसान!
मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांच्या घसरणीच्या त्सुनामीमुळे सोमवारी (ता.२१) व्यापारी सत्रात या शेअर्सवर शोककळा दिसून आली आहे. निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक दिवसाच्या उच्चांकावरून 1350 अंकांनी घसरला आहे. तर निफ्टीचा स्मॉल कॅप निर्देशांक 415 अंकांनी घसरला आहे. बाजार बंद होताना मिडकॅप निर्देशांक 1000 अंकांनी तर स्मॉलकॅप निर्देशांक 300 अंकांनी घसरला. मात्र, सेन्सेक्स-निफ्टीतील घसरण फार मोठी नव्हती. मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 73 अंकांनी घसरून, 81,151 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 73 अंकांनी घसरून, 24,781 अंकांवर बंद झाला आहे.
कोणत्या शेअर्समध्ये झाली घसरण
आज शेअर बाजारात प्रामुख्याने एफएमसीजी आणि आयटी शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे बाजारात ही मोठी घसरण झाली आहे. कोफोर्ज ५.५५ टक्के, व्होडाफोन आयडिया ५.५४ टक्के, एमआरपीएल ४.७९ टक्के, पर्सिस्टंट सिस्टम ४.५४ टक्के, आयओबी ४.२३ टक्के, हिंदुस्तान पेट्रोलियम ४.११ टक्के, पॉलीकॅब ३.९७ टक्के, बंधन बँक ३.९५ टक्के, एसबीआय ४.९५ टक्के, एसबीआय ४.९५ टक्के, कार बँक ३.९५ टक्के घसरण झाली आहे.
(फोटो सौजन्य – istock)
कोणत्या शेअर्समध्ये झाली वाढ
वाढत्या समभागांमध्ये टाटा केमिकल्स 8.77 टक्क्यांनी, ओबेरॉय रियल्टी 2.99 टक्क्यांनी, माझगाव डॉक्स 2.84 टक्क्यांनी, बीएसई 1.76 टक्क्यांनी, मॅक्स हेल्थ 1.34 टक्क्यांनी, पतंजली 0.79 टक्क्यांनी तेजीत असल्याचे पाहायला मिळाले.
गुंतवणूकदारांचे पाच लाख कोटी रुपयांचे नुकसान
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप 453.27 लाख कोटी रुपयांवर आले आहे. जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 458.21 लाख कोटी रुपये इतके नोंदवले गेले होते. याचा अर्थ आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीचे 5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)