Rajasthan Vegetable Seller Wins Lottery (photo - social media)
Income Tax on Lottery in India : कोणाच्या नशिबात काय घडेल काहीही सांगता येत नाही. किंवा लक्ष्मी कधी होणार प्रसन्न होईल सांगता येत नाही. मात्र एका भाजी विक्रेत्यावर लक्ष्मी खुश होऊन प्रसन्न झाली आहे. राजस्थानमध्ये राहत असलेल्या अमित सेहराने पंजाब लॉटरीमध्ये 11 कोटी रुपये रक्कम जिंकली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकांना याबद्दल अनेक प्रश्न पडत आहेत. मात्र, आता सरकार त्यांना लॉटरीचे किती पैसे देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
घरचा कर्ता पुरुष आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी उन्हातानात भाजीपाला विकत असतो. त्याच्यावर लक्ष्मी एवढी उदार होते कि साक्षात स्वत:च दारावर येऊन दार ठोठावते.
हेही वाचा : India Rich-Poor Gap : G-20 अहवालाचा धक्कादायक खुलासा! भारतात श्रीमंत-गरीब दरी भारतासाठी नवे संकट?
जगभरात प्रसिद्ध असलेली राजस्थानची पिंक सिटी म्हणजेच जयपूर अमित सेहरा येथील रहिवासी असून त्यांचे रातोरात संपूर्ण आयुष्य बदलले. आणि हा भाजीपाला विक्रेता करोडपती झाला आहे. अमितला एका रात्रीत 11 कोटी रुपयांचा नशिबाने पहिला जॅकपॉट लागला असून हुशारीने पैसे खर्च करेल असे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यांच्या कुटुंबासाठी त्यांना सुंदर घर बांधायचे आहे तसेच त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण द्यायचे आहे. असेही ते म्हणाले. सोबतच पंजाब सरकार आणि लॉटरी एजन्सीचे सुद्धा त्यांनी आभार मानले.
11 कोटींची लॉटरी किती पैसे हातात येणार ?
अमितला 11 कोटीमधून 3,30,00,000 रुपये कर भरावा लागेल. 13,20,000 रुपये उपकर सुद्धा द्यावा लागेल. त्यामुळे एकूण 3,43,20,000 रुपये टॅक्स भरावा लागेल. अधिभार किंवा सरचार्ज 37% तर त्यातूनही 1,26,98,400 रु. द्यावे लागतील. अशा परिस्थितीत एकूण कर 4 कोटी 70 लाख 18 हजार 400 रुपये द्यावा लागेल. टीडीएसच्या वेळी लॉटरी ऑफिससुद्धा पैसे कापून घेते. ज्यात कर कपातीच्या 31.2% कट होतात. त्यामुळे अमितला एकूण 11 कोटीतून 75,680,000 रुपये रोख मिळतील.






