Share Market Today: गिफ्ट निफ्टी आणि सेन्सेक्स सकारात्मक पातळीवर उघडणार! शेअर बाजार तज्ञांनी केली 'या' स्टॉक्सची शिफारस
शुक्रवारी झालेल्या घसरणीनंतर आज शेअर बाजार सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली घसरण आज थांबण्याची आशा आहे. जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५० सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २४,६७५ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ४८ अंकांनी जास्त होता. (फोटो सौजन्य – Pinterest)
आनंद राठी येथील तांत्रिक संशोधन उपाध्यक्ष मेहुल कोठारी, एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा आणि लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंटचे संशोधन प्रमुख अंशुल जैन यांनी गुंतवणूकदारांना चार इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे, ज्यांची किंमत १०० रुपयांपेक्षा कमी आहे. यामध्ये आयडीएफसी फर्स्ट बँक, यूको बँक, लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स आणि श्रीराम प्रॉपर्टीज यांचा समावेश आहे. गुंतवणूकदार आज डीएलएफ, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्प, सीमेन्स, मॅरिको, अरबिंदो फार्मा, आयटीसी, टाटा पॉवर, दिल्लीव्हरी, एलआयसी हाऊसिंग फायनान्स, फेडरल बँक, रेलटेल कॉर्प, मल्टी-कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया, पीएनबी हाऊसिंग, जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्स या स्टॉक्सवर लक्ष क्रेंद्रित करू शकतात.
चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना सुप्रीम पेट्रोकेम, बेस्ट अॅग्रोलाइफ , क्युपिड, रेडिको खेतान आणि अॅडव्हान्स्ड एन्झाइम टेक्नॉलॉजीज हे ५ ब्रेकआऊट स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना अंबुजा सिमेंट्स , भारती एअरटेल आणि ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स या ३ इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे.
आज कशी होणार शेअर बाजाराची सुरुवात?
सकारात्मक पातळीवर
सुमित बगडिया यांनी कोणत्या स्टॉक्सची शिफारस केली?
सुप्रीम पेट्रोकेम, बेस्ट अॅग्रोलाइफ , क्युपिड, रेडिको खेतान आणि अॅडव्हान्स्ड एन्झाइम टेक्नॉलॉजीज
१०० रुपयांपेक्षा कमी किंंमतीत कोणते स्टॉक्स खरेदी करू शकता?
आयडीएफसी फर्स्ट बँक, यूको बँक, लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स आणि श्रीराम प्रॉपर्टीज






