फोटो सौजन्य: iStock
आज जर एका व्यक्तीला भूक लागली तर तो बाहेर हॉटेलमध्ये न जाता, ऑनलाईन फूड ऑर्डर करतो. झोमॅटो हे त्यातीलच एक विश्वासार्ह ऑनलाईन फूड ऑर्डर अॅप आहे. आज झोमॅटो या नावाची लोकांना इतकी सवय झाली आहे की लोकं बोलताना देखील सहज ‘मी झोमॅटो करतोय’ असे म्हणतात. पण आता हेच झोमॅटो नाव बदललं गेलं आहे. कंपनीने आपल्या नवीन नावाबाबत खुलासा केला आहे.
देशातील आघाडीची फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने आपले नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. झोमॅटोच्या बोर्ड बैठकीत नाव बदलण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. झोमॅटो आता ‘इटरनल’ म्हणून ओळखले जाणार आहे. कंपनीने बीएसईला दिलेल्या नियामक फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे.
वाढू शकतो PF चा व्याजदर? सरकार देणार का अजून एक मोठं गिफ्ट
झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल म्हणतात की ते बऱ्याच काळापासून कंपनीसाठी इटरनल हा शब्द वापरत आहेत. ते म्हणाले, ‘जेव्हा आम्ही ब्लिंकिट विकत घेतले, तेव्हाच आम्ही झोमॅटोऐवजी मूळ कंपनीला ‘इटरनल’ म्हणू लागलो. कंपनी आणि ब्रँड/अॅपमधील फरक ओळखणे हा यामागचा उद्देश आहे.”
त्यावेळी, झोमॅटोच्या संस्थापकांनी असाही विचार केला की जर झोमॅटो व्यतिरिक्त आमचे इतर कोणतेही उत्पादन आमच्या भविष्यासाठी महत्त्वाचे ठरले, तर आम्ही कंपनीचे नाव सार्वजनिकरित्या बदलून इटरनल करू. आता ब्लिंकिटच्या यशाने आपल्याला त्या टप्प्यावर आणले आहे. आम्ही झोमॅटो लिमिटेड, कंपनीचे (ब्रँड आणि अॅपचे नाही) नाव बदलून इटरनल करत आहोत.
दीपिंदर गोयल यांनी कंपनीचे नाव ‘इटरनल’ ठेवण्यामागील कारणही स्पष्ट केले. ते म्हणतात , “इटरनल हे एक शक्तिशाली नाव आहे. आणि खरं सांगायचं तर, ते मला मनापासून घाबरवते. हे फक्त नाव बदलणे नाही; हे एक मिशन स्टेटमेंट आहे. हे नाव आता आमच्या ओळखीचा एक भाग आहे, जे आम्हाला आमच्या उद्देशाची नेहमीच आठवण करून देईल.”
मोफत रेशन घेणाऱ्यांवर आता Income Tax ची करडी नजर, ‘या’ यादीत नाव असेल तर गहू-तांदळालादेखील मुकणार
झोमॅटोच्या नाव बदलाचा खरा परिणाम बाजारात दिसून येईल. तिथे कंपनीचे नाव झोमॅटो वरून इटरनल असे बदलले जाईल. हे येथे झोमॅटोसह कंपनीच्या सर्व उपकंपन्यांचे प्रतिनिधित्व करेल. सध्या झोमॅटोचे चार मोठे व्यवसाय आहेत.
यापैकी पहिले म्हणजे झोमॅटो, फूड डिलीव्हरी प्लॅटफॉर्म. दुसरा क्विक कॉमर्स म्हणजे ब्लिंकिट, जे किराणा सामान आणि इतर आवश्यक वस्तू पोहोचवते. याचे District प्लॅटफॉर्मचा वापर चित्रपट आणि कार्यक्रमांच्या तिकिटांसाठी केला जातो. त्याच वेळी, Hyperpure प्लॅटफॉर्म रेस्टॉरंट्सना घाऊक दरात भाज्या आणि किराणा सामान पुरवतो.
आज झोमॅटोच्या शेअरची किंमत ०.५३ टक्क्यांनी वाढून २२९.९० रुपयांवर बंद झाली. गेल्या एका वर्षात कंपनीने सुमारे ६५ टक्के परतावा दिला आहे.