फोटो सौजन्य - Social Media
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या AAI-Cargo Logistics & Allied Services Company Limited (AAI-CLAS) तर्फे सहाय्यक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना 3 जून 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवार 9 जून 2025 पासून 7 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्यासाठी अधिकृत वेबसाइट aaiclas.aero वर भेट द्यावी लागेल.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वयोमर्यादा 1 जून 2025 रोजी 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल.
AAI-CLAS सहाय्यक पदांसाठीची निवड प्रक्रिया चार टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. सर्वप्रथम प्राप्त अर्जांमधून पात्र उमेदवारांची Shortlisting केली जाईल. त्यानंतर Interview Test म्हणजेच मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. त्यानंतर कागदपत्र तपासणी (Document Verification) आणि शेवटी वैद्यकीय तपासणी (Medical Examination) होईल. या सर्व टप्प्यांत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल.
अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून उमेदवारांनी प्रथम अधिकृत अधिसूचना वाचून पात्रता अटी तपासाव्यात. त्यानंतर ‘Apply Online’ लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत आवश्यक माहिती भरणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि शुल्क भरणे या सर्व टप्प्यांत काळजी घ्यावी. अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रत सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.
या भरती प्रक्रियेअंतर्गत सहाय्यक पदासाठी निवड झाल्यास उमेदवारांना AAI-CLAS या सरकारी उपक्रमात काम करण्याची संधी मिळणार आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांनी 7 जुलै 2025 अगोदर आपला अर्ज लवकरात लवकर सादर करावा.