फोटो सौजन्य- सोशल मीडिया
AIIMS Recruitment 2026: सरकारी नोकरीच्या तयारीमध्ये गुंतलेल्या तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (AIIMS) कॉमन रिक्रूटमेंट एक्झामिनेशन (CRE-5) २०२६ अंतर्गत ग्रुप ‘बी’ आणि ग्रुप ‘सी’ च्या विविध पदांवर भरतीची अधिसूचना (Notification) जारी केली आहे. या भरती मोहिमेद्वारे देशातील वेगवेगळ्या एम्स (AIIMS) संस्थांमध्ये आणि इतर केंद्रीय शासकीय आरोग्य संस्थांमध्ये एकूण १,४८४ पदे भरली जाणार आहेत. तरी उमेदवारांनी ३ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
या भरती प्रक्रियेद्वारे एकूण १,४८४ जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये सिनियर एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, असिस्टंट एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, ज्युनिअर एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर,एग्झिक्युटिव्ह असिस्टंट, ऑफिस सुपरिटेंडेंट, असिस्टंट, लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), ज्युनिअर इंजिनिअर, असिस्टंट इंजिनिअर, असिस्टंट डायटिशियन, डायटिशियन, वॉर्डन, स्टोअर कीपर, कॅशियर आणि ज्युनिअर अकाउंट्स ऑफिसर यांसह इतर अनेक पदांचा समावेश आहे.
वेगवेगळ्या पदांनुसार शैक्षणिक पात्रता भिन्न आहे. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेतून इयत्ता १० वी, १२ वी, पदवी (Graduation) किंवा पदव्युत्तर (Master’s Degree) पदवी असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव (Experience) मागण्यात आला आहे. या पदांसाठी २१ ते ५० वर्षांपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात.
निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड संगणक आधारित परीक्षा (CBT) आणि त्यानंतर पदाच्या आवश्यकतेनुसार होणाऱ्या स्किल टेस्ट (Skill Test) च्या आधारे केली जाईल.
अर्ज शुल्क (Application Fee)
सामान्य (General) आणि ओबीसी (OBC) उमेदवरांना ३,००० रुपये शुल्क भरावे लागतील. एससी (SC), एसटी (ST) आणि ईडब्ल्यूएस (EWS) उमेदवरांना २,४०० रुपये
तर दिव्यांग उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात आले नाही.
१. इच्छुक उमेदवारांनी सर्वात आधी एम्सच्या अधिकृत संकेतस्थळ aiimsexams.ac.in ला भेट द्यावी.
२. होमपेजवर उपलब्ध असलेल्या ‘AIIMS CRE-5 Recruitment 2026’ या लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी.
३. अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून अर्ज फॉर्ममध्ये सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूक भरावी.
४. आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करावी.
५. तुमच्या प्रवर्गातील फी भरून फॉर्म सबमिट करावा आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्यावी.






