फोटो सौजन्य - Social Media
जर तुम्ही IPS तसेच IAS बनण्यास इच्छुक आहात तर UPSC परीक्षेला पात्र करणे अनिवार्य असते. UPSC परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत सुरु करण्यात आली होती. जर तुम्ही अद्याप या परीक्षेसाठी अर्ज करू शकला नाही आहात तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच सिविल सर्विसेज एग्जाम 2025 (प्रीलिम्स) आयोजित करण्यात येणार आहे. जर तुम्ही या अर्ज प्रक्रियेला मुकला असाल तर टेन्शन नॉट! कारण अर्ज करण्याची मुदत १८ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे या वाढवण्यात आलेल्या मुदतीचा फायदा घेत तुम्ही या परीक्षेसाठी अर्ज नोंदवू शकता. मुळात, IAS तसेच IPS बनण्याची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांना या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे.
अर्ज ऑनलाईन स्वरूपात स्वीकारण्यात येणार आहे. परीक्षेसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करून घ्यावे. मुळात, इच्छुक उमेदवारांना ११ फेब्रुवारी या तारखेपर्यंतच अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. नंतर ही मुदत वाढवून १८ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली आहे. अर्ज करण्याची मुदत वाढवण्यामागचे कारण उमेदवारांना अर्ज करताना आलेल्या काही तांत्रिक अडचणी आहेत. तसेच अर्जामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास उमेदवारांना त्या सुधारताही येणार आहेत.
काही कार्यकाळासाठी करेक्शन विंडो खुले करण्यात येणार आहेत, जेणेकरून उमेदवारांना आपल्या त्रुटी सुधारता येतील. १९ फेब्रुवारी २०२५ या तारखेपासून अर्जातील त्रुटी सुधारण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तसेच उमेदवारांना २५ फेब्रुवारीपर्यंत त्रुटी सुधारता येणार आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज :