फोटो सौजन्य - Social Media
या स्पर्धांमध्ये सोनाक्षी मोहिते, अन्विता गायकवाड, समृद्धी चांदवडे, श्लोक शिवतरकर, कुणाल मालप, भूषण शिंदे, भाविका त्रिकाळ, कृतिका चव्हाण आणि आकांक्षा नाईक या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत विविध पारितोषिके पटकावली. त्यांच्या उत्तम सादरीकरणाने परीक्षकांची मने जिंकली आणि शाळेचा मान उंचावला.
विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन असून, संचिता कणसे आणि जयवंत कुलकर्णी या शिक्षकांचा विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. याशिवाय, विज्ञान प्रदर्शनासाठी सादर केलेल्या उद्घाटन प्रकल्पासाठी अवधूत चव्हाण, अमोल जागले आणि घनश्याम जोशी यांच्या सर्जनशील कार्याचे आमदार अभ्यंकर यांच्या हस्ते विशेष कौतुक करण्यात आले. शाळेच्या सजावटीत आणि सादरीकरणात मोलाचे योगदान देणाऱ्या रत्नकांत विचारे आणि विश्वनाथ पांचाळ यांनाही फलक लेखन आणि रांगोळी सजावटीसाठी सन्मानित करण्यात आले.
या सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक करत शाळेचे मुख्याध्यापक अनिल पाचाळ यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच, त्यांनी विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशीच प्रगती साधावी आणि शाळेचा गौरव वाढवावा, अशा शुभेच्छा दिल्या. गांधी बाल मंदिर शाळेचा हा सर्वांगीण यशस्वी उपक्रम शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात शाळेची गुणवत्ता आणि कर्तृत्व अधोरेखित करणारा ठरला आहे.c






