फोटो सौजन्य - Social Media
बिहार लोकसेवा आयोगाने (BPSC) लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) पदासाठी अधिकृत भरती अधिसूचना जाहीर केली आहे. BPSC LDC Recruitment 2025 ची अधिसूचना 1 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 8 जुलै 2025 पासून सुरु होणार आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 जुलै 2025 आहे.
या भरतीत एकूण 26 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही संधी 12वी उत्तीर्ण तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे, विशेषतः जे सरकारी नोकरीसाठी तयारी करत आहेत. त्यांना या भरतीसाठ अर्ज करता येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून लोअर डिव्हिजन क्लर्क पदासाठी उमेदवाराना अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी एकूण २६ जागा रिक्त आहेत. किमान १२ वी उत्तीर्ण असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच उमेदवारांना टायपिंगचा अनुभव असणे अनिवार्य आहे. अधिसूचनेमध्ये नमूद असणाऱ्या वयोमर्यादे संबंधित अटीनुसार, 1 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 37 वर्षे दरम्यान वय असणे आवश्यक आहे. मागासवर्गीय, महिलांसाठी व इतर राखीव प्रवर्गासाठी शासनाच्या नियमांनुसार सवलत दिली जाईल.
या भरतीसाठी निवड प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीसाठी उमेदवारांची निवड पुढील टप्प्यांद्वारे केली जाईल. या टप्प्यांमध्ये लेखी परीक्षा, टायपिंग चाचणी, मूळ कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीचा समावेश आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज:
ही भरती केवळ सरकारी नोकरीची संधीच नाही, तर स्थिर आणि सुरक्षित करिअरसाठी एक विश्वासार्ह पाऊल आहे. ज्यांना सरकारी सेवेत प्रवेश करायचा आहे, त्यांनी ही संधी गमावू नये.