पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर पदी रवि लांडगे यांची बिनविरोध निवड
तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैशाली जालिंदर काळभोर आणि भारतीय जनता पक्षाच्या शर्मिला राजू बाबर यांचा प्रत्येकी १ असे एकूण २ अर्ज प्राप्त झाले होते. यावेळी अर्ज माघारीसाठी देण्यात आलेल्या विहीत वेळेत वैशाली काळभोर यांनी अर्ज माघारी घेतल्याने शर्मिला बाबर यांची बिनविरोध उपमहापौर पदी निवड करण्यात आली. तसेच सभागृह नेतेपदी प्रशांत शितोळे आणि विरोधी पक्षनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Google Doodle Today: क्रिकेट प्रेमींसाठी गुगलचे खास सरप्राईज! T20 World Cup निमित्त सादर केले स्पेशल
पिठासीन अधिकारी दिपक तावरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेची विशेष सभा आज पार पडली. नगरसचिव मुकेश कोळप यांनी सुरूवातीस सभेच्या कामकाजाबाबत माहिती दिली. त्यानंतर महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.
यावेळी सर्वसाधारण सभेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर तसेच सभागृह नेते प्रशांत शितोळे यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर नगरसदस्य शत्रुघ्न काटे यांनी महापालिकेची सर्वसाधारण सभा २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत स्थगित करण्याबाबत सूचना मांडली. या सूचनेला नगरसदस्य राजू मिसाळ यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर महापौर रवि लांडगे यांनी सर्वसाधारण सभा २० फेब्रुवारी २०२६, दुपारी १ वाजेपर्यंत तहकूब केली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील प्रांगणात असलेल्या दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास महापौर रवि लांडगे व उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शहरातील विविध ठिकाणी असणाऱ्या महापुरूषांच्या पुतळ्यांस देखील त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.






