"40 लाख द्या, प्रश्नपत्रिका घेऊन जा"; MPSC परीक्षेबाबत Call Recording Viral, आयोगाचा महत्त्वाचा खुलासा
देशातील तरुणांमध्ये स्पर्धा परीक्षेचं महत्त्व जास्त दिलं जातं. सरकारी नोकरी मिळावी यासाठी अनेक तरुण मंडळी या स्पर्धा परीक्षांसाठी बरीच वर्ष तयारी करतात. मात्र या स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आजवर घडले आहेत. याचपार्श्वभूमी पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षांबाबतचा गैरप्रकार उघडकीस आला आहे. 2 फेब्रुवारीला महाराष्ट्र लोकलसेवा आयोगाच्या परीक्षा होणार आहेत. याचधर्तीववर 40 लाख द्या आणि प्रश्नपत्रिका घेऊन जा, असं नागपूरमधील फोन रेकॉर्डींग व्हायरल होत आहे. एमपीएसची तयारी करत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना असे फोन कॉल्स आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. याबाबत लोकसेवा आयोगाकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
राज्यात दहा हजार पदांसाठी मेगा पोलीस भरती; जाणून घ्या भरतीच्या प्रक्रियेविषयी
नागपूरमधल्या एका कंसल्टंसी कडून कॉल MPSC स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉल्स आल्याचं सांगितलं जात आहे. या कॉलमध्ये असं सांगण्यात आलं की, तुम्ही 40 लाख रुपये भरा आणि प्रश्नपत्रिका घेऊन जा. दरम्यान या सगळ्याप्रकरणामुळे पुण्यातील परीक्षा केंद्रावर खळबळ माजली आहे. सदर प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत परीक्षा आयोगाने एक पत्रक जारी केलं आहे. या पत्रकामध्ये आयोगाने स्पष्टपणे सांगितलं की, MPSC परीक्षेचे पेपर फुटलेले नाही. सगळे पेपर सुरक्षित आहेत. त्यामुळे विद्यार्थांनी घाबरुन जावू नये. असं या पत्रकात सांगितलं गेलं आहे.
MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नागपूरमधल्या एका कंसल्टंसीचा कॉल आल्याचा दावा करण्यात आला होता. यात असं सांगण्यात आलं होतं की, 2 फेब्रुवारीला होणाऱ्या परीतक्षेची प्रश्नपत्रिका तुम्हाला आधीच दिली जाईल. जर तुम्हाला परीक्षा पास व्हायचं असेल आणि नोकरी पाहिजे असेल तर आपण व्हॉट्सअपवर मिटींग घेऊन पुढच्या प्रक्रिया पुर्ण करु. जर तुम्हाला यावर विश्वास नसेल तर पैसे नाही भरले तरी चालतील फक्त तुमचे ओरीजनल कागदपत्रं जमा करावे लागतील असं या कॉलमध्ये विद्यार्थ्यांना सांगण्यात येत होतं. म्हणूनच सदर प्रकरण संवेदनशील होऊ नये यासाठी आयोगाने पत्रक जारी करत ही अफवा असल्याचं सांगितलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे पेपर फुटलेले नाहीत तरी विद्यार्थ्यांनी याबाबत निश्चिंत राहावं असं सांगण्यात आलं आहे.