ठाणे/स्नेहा जाधव,काकडे : देशात सुशिक्षित बेरोजगारांची संख्य़ा जास्त आहे. केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या वतीने वेगवेगळ्या रिक्त पदांच्या भरतीसाठीची जाहिरात जारी केली जाते. तसंच आता प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत ठाणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या पाच रिक्त पदांची भरती करण्यात येत असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दि.24 सप्टेंबर, 2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत असून, इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज जिल्हा परिषद ठाणे मुख्यालय येथे स्वतः सक्षम पद्धतीने किंवा टपालाद्वारे जमा करावा. अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती पडताळणीसाठी सादर करणे आवश्यक आहे.
या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना रु. 25 हजार प्रतिमाह मानधन देण्यात येईल. शैक्षणिक अर्हता व इतर अटी जाहिरातीत स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत.भरतीसंदर्भातील जाहिरात व अर्जाचा नमुना जिल्हा परिषद ठाणेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://zpthane.maharashtra.gov.in उपलब्ध करून देण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज दाखल करून या संधीचा लाभ घ्यावा, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी आवाहन केले आहे.