IAS Story: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नाव चांगलेच चर्चेत आहे, ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार. त्यांच्या सुपुत्र पार्थ पवार यांचा पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणात समावेश असल्याने हे प्रकरण सध्या गाजत आहे. ४० एकर सरकारी जमीन केवळ ३०० कोटी रुपयांना विकल्याचा संशय होता, तर त्याची बाजारभाव किंमत १८०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. एवढेच नाही तर २१ कोटी रुपयांची मुद्रांक शुल्क सूटही देण्यात आल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण घोटाळ्यात एका आयएएस अधिकाऱ्याचे नाव देखील चर्चेत आले आहे. तो नाव म्हणजे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे.
अधिकारी तुकाराम मुंढे आपल्या कडक शिस्ती आणि प्रामाणिकपणासाठी ओळखले जाणारे मुंढे हे २० वर्षांच्या सेवेत तब्बल २४ वेळा बदली झालेले अधिकारी आहेत. विरोधकांनी पुणे जमीन प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली असून त्यामुळे मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. तुकाराम मुंढे आहेत तरी कोण? चला जाणून घेऊया.
कोण आहेत तुकाराम मुंढे
IAS अधिकरी तुकाराम मुंढे यांचा जन्म ३ जून १९७५ रोजी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील ताडसोना या छोट्याश्या गावात झाला. ते ओबीसी वर्गात येणाऱ्या वंजारी समाजाचे आहेत. त्यांचे वडील शेतकरी होते. त्यांचे बालपण गरिबीत गेले. शाळेतून परतल्यानंतर ते वडिलांना शेतात मदत करायचे. ते शेतात भाजीपाला पिकवायचे आणि बाजारात विकायचे. मात्र, दहावीनंतर त्यांचे जीवन बदलले. दहावीनंतर ते नातेवाईकांसोबत राहण्यासाठी आणि तिथेच महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी औरंगाबादला गेले.
तुकाराम यांनी १९९६ मध्ये इतिहासात बीए केले. त्यानंतर ते मुंबईला गेले आणि त्यांनी राज्यशास्त्रात एमए केले. त्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. त्यांचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला परंतु त्यांनी हार मानली नाही. अखेर २००५ मध्ये त्यांच्या मेहनतीला यश मिळाले. त्यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण केली आणि २००५ च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी झाले.
सोलापूरमध्ये त्यांची पहिली पोस्टिंग उपजिल्हाधिकारी म्हणून झाली. तिथे त्यांनी बेकायदेशीर दारूच्या अड्ड्यांवर छापे टाकले आणि खळबळ उडवून दिली. त्यांच्या २० वर्षांच्या आयएएस सेवे त्यांची २४ वेळा बदली झाली. त्यांच्या या कडक शिस्ती आणि प्रामाणिकपणामुळे ते राजकारणी आणि माफियांचे लक्ष्य राहिले आहे. असे देखील म्हंटले जाते. परंतु त्यांनी आपल्या कामात कुठेही तडजोड केली नाही. त्यांनी जानेवारी २०२५ मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा कार्यभार स्वीकारला, मात्र ऑगस्ट २०२५ मध्ये त्यांची पुन्हा बदली झाली.
आता ते मुंबईत अपंग कल्याण विभागाचे सचिव आहेत. याआधी ते असंघटित कामगार विकास आयुक्त होते. त्यांच्या बदली यादीकडे पाहता असे दिसून येते की त्यांना दर दोन-तीन वर्षांनी एक नवीन जागा आणि नवीन जबाबदाऱ्या देण्यात येत होत्या. २४ वेळा बदली झाली तर खरी २४ वेळा त्यांना वेगवेगळे पद देण्यात येत होते.
२४ बदल्या कुठे आणि कोणत्या विभागात?
2005 – सोलापूर येथे प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती
2007 – देगलूर उपविभागाचे उपजिल्हाधिकारी म्हणून बदली
2009 – नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)
2010 – आदिवासी विभागाचे आयुक्त
2011 – वाशिम जिल्ह्याचे CEO
2012 – कल्याण जिल्हा परिषदचे CEO
2013 – जालना जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी
2013 – मुंबईचे विक्रीकर सहाय्यक आयुक्त
2014 – पुन्हा सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी
2016 – नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त
2017 – पुणे पीएमपीएल (PMPML) चे मुख्य कार्यकारी अधिकारी
2018 – नाशिक महानगरपालिका आयुक्त
2019 – नियोजन विभागात सहसचिव
2019 – मुंबई एड्स नियंत्रण प्रकल्प अधिकारी
2020 – नागपूर महानगरपालिका आयुक्त
2021 – महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव
2021 – राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात अधिकारी
2022 – आरोग्य सेवा आयुक्त, महाराष्ट्र
2025 (सध्या) – दिव्यांग कल्याण सचिव, मुंबई
त्यांनी कारकिर्दीत राबवलेले उपक्रम
आज ते मुंबईत अपंग कल्याण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या बदलींच्या यादीवरून एक गोष्ट स्पष्ट होते. तुकाराम मुंढे जिथे जातात तिथे काम आणि प्रामाणिकपणा दिसतो. त्यांचा प्रवास हा मेहनत, प्रामाणिकता आणि धैर्य यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे.
Ans: बीड
Ans: २००५
Ans: दिव्यांग






