फोटो सौजन्य - Social Media
भारतातील वर्किंग प्रोफेशनल्स आता त्यांच्या करिअरच्या प्रगतीसाठी अधिक सजग झाले आहेत आणि नव्या कौशल्यांच्या शिकवणुकीकडे (Upskilling) स्वतःहून पावले उचलत आहेत. टीमलीज एडटेकच्या ‘Upskillingचा परफॉर्मन्स अप्रेजलवर परिणाम’ या नव्या अभ्यासानुसार, फक्त २३.९% नियोक्त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी Upskilling चे पूर्ण प्रायोजन केले, तर तब्बल ४६% कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या खर्चावर नवे स्किल्स शिकण्याचा निर्णय घेतला. या अभ्यासात टेक्नोलॉजी, फायनान्स, सेल्स, ऑपरेशन्स आणि मानव संसाधन या विविध क्षेत्रांतील १४,००० हून अधिक वर्किंग प्रोफेशनल्सच्या प्रतिक्रिया संकलित करण्यात आल्या. त्यात ८४% जणांनी मागील वर्षभरात काही ना काही प्रकारची Upskilling केली, जी मुख्यतः दीर्घकालीन करिअर नियोजन व भविष्यातील नोकरीसाठी तयारी म्हणून करण्यात आली.
या Upskilling चा थेट फायदा कर्मचाऱ्यांच्या अप्रेजलवरही झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ६४% पेक्षा अधिक उत्तरदात्यांनी सांगितले की, नवीन कौशल्ये आत्मसात केल्यामुळे त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन अधिक चांगल्या पद्धतीने झाले. विशेष म्हणजे, ४२% जणांना Upskilling केल्यानंतर अवघ्या १८ महिन्यांत प्रमोशन, जबाबदारीत वाढ किंवा पगारवाढ मिळाली. यातील बऱ्याच जणांनी मुद्दाम अप्रेजलच्या कालावधीत Upskilling केली, जेणेकरून त्याचा अप्रेजलवर प्रभावी परिणाम होईल.
तांत्रिक आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी सर्वाधिक स्वखर्ची Upskilling करणारे ठरले असून, ७८.३% जणांनी स्वतःहून हे शिक्षण घेतले. दुसरीकडे, विक्री आणि मार्केटिंग क्षेत्रातील ८०% कर्मचाऱ्यांनी अल्पकालीन ऑनलाइन कोर्सेस, ट्यूटोरियल्सचा आधार घेतला. हे “Just-in-Time” आणि खर्चिक दृष्टिकोनातून सोपे शिक्षण प्रकार अधिक प्रमाणात वापरले जात आहेत.
टीमलीज एडटेकचे सीईओ शांतनू रूज यांनी सांगितले की, “जे कर्मचारी स्वतःच्या शिक्षणात गुंतवणूक करतात, त्यांना केवळ नवीन कौशल्येच नव्हे तर नवी संधी, जबाबदारी आणि खरी करिअर प्रगती मिळते.” त्यांनी संस्थांना अपील केले की, कर्मचाऱ्यांच्या निष्ठा व बांधिलकीसाठी संगठित Upskilling कार्यक्रम तयार करावेत. एकूणच, अपस्किलिंगचा कल आता स्वप्रेरणेने होऊ लागला असून, संस्थांनीही हे गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. कारण, शिक्षण आणि त्याचे वेळेवर मूल्यांकन हे करिअर यशासाठी ठरते.