फोटो सौजन्य - Social Media
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या यू. आर. राव सॅटेलाइट सेंटर (URSC), बेंगळुरूने कनिष्ठ संशोधन सहकारी (JRF) आणि संशोधन सहयोगी (RA-I) पदांसाठी भरतीची अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना URSC बेंगळुरू येथे विविध अवकाश तंत्रज्ञान संशोधन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळणार आहे. पात्र उमेदवार ISRO च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन दिलेल्या तारखांमध्ये ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखत आणि कागदपत्र पडताळणीद्वारे केली जाणार आहे.
ISRO JRF पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रातील M.E/M.Tech/M.Sc (Engg.) पदवी किमान 60% गुण किंवा 6.5/10 CGPA सह असणे आवश्यक आहे. संशोधन सहयोगी (RA-I) पदासाठी Ph.D. पदवी असावी किंवा M.E/M.Tech सह 3 वर्षांचा संशोधन अनुभव आणि किमान एक SCI प्रकाशन असणे गरजेचे आहे. या पदांसाठी पात्रतेसाठी आवश्यक क्षेत्रांमध्ये मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स, संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, एरोस्पेस अभियांत्रिकी, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, RF आणि मायक्रोवेव्ह अभियांत्रिकी, VLSI, ऑप्टिकल अभियांत्रिकी, थर्मल अभियांत्रिकी आणि मटेरियल सायन्स यांचा समावेश आहे.
या भरतीसाठी JRF पदासाठी कमाल वयोमर्यादा 28 वर्षे आणि RA-I साठी 35 वर्षे आहे. SC/ST उमेदवारांना 5 वर्षे, OBC (NCL) उमेदवारांना 3 वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांना 10 वर्षे वयोमर्यादेत सवलत मिळेल. माजी सैनिकांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे. उमेदवारांची निवड प्राथमिक शॉर्टलिस्टिंग, मुलाखत आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाणार आहे.
उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ISRO च्या अधिकृत वेबसाइट [www.isro.gov.in](https://www.isro.gov.in) वर जावे लागेल. त्यानंतर “Careers” सेक्शनमध्ये जाऊन JRF/RA-I भरती 2025 निवडावी लागेल. उमेदवारांना वैध ई-मेल आणि मोबाईल क्रमांकासह नोंदणी करावी लागेल. त्यानंतर अर्जातील आवश्यक माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. अर्ज अंतिम तारखेपूर्वी म्हणजेच 20 एप्रिल 2025 पर्यंत सबमिट करावा लागेल. भविष्यातील संदर्भासाठी उमेदवारांनी नोंदणी क्रमांक जतन करून ठेवणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी ISRO च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.