फोटो सौजन्य - Social Media
सावित्रीबाई फुले विद्यापीठात या भारतीयाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिष्ठाता आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक पदांसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. १३ नोव्हेंबरपासून उमेदवारांना अर्ज करायचे असून १२ डिसेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. दिलेल्या मुदतीच्या अंतर्गत उमेदवारांना सगळे नियम पाळून अर्ज करता येणार आहे. अधिष्ठाता पदासाठी ४ जागा (मानव्यविज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, विज्ञान व तंत्रज्ञान, आंतरविद्याशाखीय अभ्यास) रिक्त आहेत. तर रीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक पदासाठी फक्त १ जागा शिल्लक आहे.
पदांचे वाटप हे आरक्षणावरून करण्यात येणार आहे. ओबीसी पदासाठी १ जागा रिक्त आहे. एससी पदासाठी १ जागा, विमुक्त जाती (अ) पदासाठी १ जागा रिक्त तर अराखीव पदासाठी १ जागा रिक्त आहे. ही भरती उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या नव्या नियमांनुसार निवड प्रक्रिया होणार. एकूण १०० गुणांची परीक्षा घेण्यात येणार असून शैक्षणिक पात्रतेमध्ये किमान ५० गुण निश्चित करण्यात आले आहे तर मुलाखतीमध्ये ५० गुण. १०० गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना भरतीमध्ये नियुक्त करण्यात येणार आहे. सध्या अधिष्ठात्यांची कामे प्रभारी पदांवरून चालवली जात आहेत. भरती प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न. जाहिरात आणि अर्जाची लिंक: विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध.






