फोटो सौजन्य - Social Media
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने (SCI) लॉ क्लर्क-कम-रिसर्च असोसिएट्स या पदांसाठी अल्पकालीन करार तत्त्वावर भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. २०२५-२०२६ या वर्षासाठी अंदाजे ९० पदे उपलब्ध आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात कार्य करण्याची संधी मिळणार आहे आणि त्यांना मासिक ₹80,000/- इतके एकत्रित मानधन दिले जाणार आहे. हे पद कायद्याच्या पदवीधारकांसाठी न्यायव्यवस्थेस योगदान देण्यासह महत्त्वपूर्ण विधी संशोधनाचा अनुभव मिळवण्यासाठी उत्तम संधी ठरू शकते.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १४ जानेवारी २०२५ पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ फेब्रुवारी २०२५ आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेसह इतर अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. या भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीचा क्रमांक No.F.21 (LC)/2025-SC (RC) असा आहे. अनेक उमेदवारांनी या भर्तीसाठी अर्ज केले असून उर्वरित इच्छुक उमेदवारांनी मुदत संपण्याअगोदर अर्ज करणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी काही रक्कमेची भरपाई अर्ज शुल्क म्हणून करावी लागणार आहे. सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तसेच उमेदवारांना बँक चार्जेस पण भरावे लागणार आहेत. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील सारखीच रक्कम आणि बँकेचे चार्जेस भरावी लागणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करता येणार असून अर्ज शुल्कही ऑनलाईन माध्यमातून स्वीकारण्यात येणार आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही पात्रता निकष पात्र करावे लागणार आहेत. हे अटी शर्ती उमेदवारांच्या शिक्षणासंदर्भात आहेत. तसेच उमेदवाराच्या वयोमर्यादेसंदर्भात आहेत. एकंदरीत, किमान २० वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे आणि जास्तीत जास्त ३२ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अधिसूचनेमध्ये नमूद असलेल्या शैक्षणिक अटी शर्तीनुसार, उमेदवार LLB असणे आवश्यक आहे.
नियुक्तीच्या प्रक्रियेत पाच टप्प्यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षेचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्प्यातही उमेदवारांना लेखी परीक्षा उपस्थित राहावी लागणार आहे. मुलाखतीला पार करत उमेदवारांन दस्तऐवजांच्या पडताळणीसाठी यावे लागणार आहे. तसेच वैद्यकीय चाचणीला पात्र करत उमेदवारांना या भरतीसाठी नियुक्त होता येणार आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.