विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी या विषयावर आधारित 53वे कर्जत तालुका प्रदर्शन नेरळ येथील शार्विल स्कूल मध्ये भरले आहे. कर्जत पंचायत समिती शिक्षण विभाग तालुका विज्ञान आणि गणित मंडळ आणि शार्विल स्कूल ऑफ एक्सलँस यांच्या संयुक्त विद्यमाने ही प्रदर्शन भरले आहे. या प्रदर्शनात प्राथमिक,माध्यमिक या दोन गटात तब्बल 189 प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत. त्या प्रतिकृती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात तालुक्यातील विविध शाळांचे विद्यार्थी यांनी गर्दी केली आहे. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यापासून तालुक्यातील माध्यमिक आणि प्राथमिक शाळांचे विद्यार्थी यांनी प्रदर्शनाला भेटी देत आहेत. या प्रदर्शनाचा विषय लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिकृती मांडल्या आहेत,त्यात प्रामुख्याने आत्मनिर्भर भारत हा विषय घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प हे सरकारला सूचना करणारे ठरू शकतात.
जगभरात आणि देशपातळीवर मागील वर्षभरात मोठ्या प्रमाणात विमान अपघात झाले आहेत. त्या धर्तीवर अभिनव शाळा कर्जत यांच्याकडून मांडण्यात आलेल्या प्रतिकृती नुसार विमान प्रवासातील आपत्कालीन यंत्रणा या विषयावर आरुषी घावट हिने विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्यास काय करावं याबाबत प्रकल्प सादर केला. कारमधील एअर बॅग प्रमाणे विमानात माहिती मिळेल आणि त्यानुसार पायलट कडून आपत्कालीन स्थितीत प्रवासी पॅराशूट प्रमाणे खाली उतरताना एकत्र सर्व प्रवासी उतरू शकतात, अशी सूचना करणारे आपत्कालीन यंत्रणा प्रतिकृती मधून साकारली आहे. बिघाड झाल्यानंतर प्रवासी पाण्यात, जमिनीवर डोंगरावर खाली येत असताना विमानाचा पॅराशूट सारखा खाली येणारा भाग सर्वांचे प्राण वाचवू शकतो अशी सूचना देण्याचा प्रयत्न झाला आहे.
नेरळमधील एल ए इ एस शाळेच्या विद्यार्थ्यांकडून ट्रॅकपल्स या नावाची प्रतिकृती प्रदर्शनात असून त्यात रेल्वे मार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी सेन्सर यंत्रणा कार्यान्वित होऊ शकेल असे मत प्रदर्शन करणारे मॉडेल ठेवले आहे. कोणत्याही रेल्वे मार्गावरील रुळामध्ये भेगा पडणे, क्रॉक होणे हे पाहण्याचे काम दर आठ दिवसांनी होते,मात्र रेल्वे कर्मचारी कडून पाहणी केल्यावर दुसऱ्या दिवशी रुळाला क्रॉक गेल्यावर काय करावे? याबाबत सतर्कता दर्शविणारे रेल्वे सेन्सर यंत्रणेनुसार त्या रुळावरील आणि मार्गावरील अपघाताची स्थिती आधीच लक्षात येईल असे हे सेन्सर आहे.हा प्रकल्प आर्या अरुण खडेकर हिने मांडला आहे.
Ans: विद्यार्थ्यांच्या प्रतिकृतींमधून प्रामुख्याने आपत्कालीन परिस्थिती, अपघात प्रतिबंध, आत्मनिर्भर भारत आणि सुरक्षिततेशी संबंधित उपाययोजना मांडण्यात आल्या आहेत.
Ans: अभिनव शाळा, कर्जत येथील आरुषी घावट हिने विमानात तांत्रिक बिघाड झाल्यास पॅराशूट प्रणालीद्वारे सर्व प्रवाशांना सुरक्षितरीत्या खाली उतरवता येईल अशी आपत्कालीन यंत्रणा सुचवली आहे.
Ans: नेरळ येथील एल.ए.आय.ई.एस शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘ट्रॅकपल्स’ नावाची सेन्सर आधारित प्रतिकृती मांडली आहे.






