सिल्लोड तालुक्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त तालुक्यातील सारोळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून शाळेतील शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांची व शिक्षकवर्गाची माहिती शालेय सुविधा सूचना व परिपत्रके विविध कार्यक्रम व उपक्रमांची छायाचित्रे व माहिती ही सर्व माहिती पालक व नागरिकांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
डिजिटल युगाशी सुसंगत पाऊल टाकत शाळेने ही वेबसाईट सुरू केली असून, यामुळे शाळेच्या कामकाजात पारदर्शकता, माहितीची सुलभता, पालक-शाळा संवादात सुधारणा होण्यास निश्चितच मदत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याची माहिती मुख्याध्यापक सुधाकर बावस्कर यांनी दिली. वेबसाईट निर्मितीबाबत विशेष उल्लेख या वेबसाईटची निर्मिती जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी यश मेटे यांनी केली.
या उपक्रमाबद्दल शाळा व ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. वेबसाईट उद्घाटन प्रसंगी केंद्रप्रमुखा एस.टी.राऊत, मुख्याध्यापक सुधाकर बावस्कर, शिक्षकवर्ग, व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन गोरे, उपाध्यक्ष बबना वराडे, सदस्य संजय काळे, सरपंच रेखा गायकवाड, उपसरपंच नारायण वराडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश वराडे दादाराव समिंद्रे, काझी इम्रान, माजी सरपंच दादारावा दांडगे, पोलिस पाटील सुधाकर काकडे, प्रवीण जयस्वाल, तसेच गावकरी उपस्थित होते.






