फोटो सौजन्य- सोशल मीडिया
प्रत्येक विद्यार्थ्याला एक हजार रुपये किमतीचा तीन पुस्तकांचा संच देण्यात आला. यामध्ये मानसिक क्षमता चाचणी (एमएटी), शैक्षणिक योग्यता चाचणी (एसएटी) आणि पाच सराव परीक्षांच्या दहा प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे. ही पुस्तके स्पर्धा परीक्षा तज्ज्ञांनी तयार केली आहेत.
३० ऑक्टोबर रोजी शरदचंद्र पवार ई-लर्निंग स्कूल, वडगाव येथे झालेल्या कार्यक्रमात रोटरी अध्यक्ष विनोद अग्रवाल, प्रकल्प समन्वयक हेमंत वाळिंबे, सचिव संजीव महाजन, मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
रोटरी क्लब गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे. २०२६-२७ मध्ये पुणे, रायगड, रत्नागिरी आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील ५५०० विद्यार्थ्यांना संच देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती अध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी दिली.
यावेळी पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या की, “विद्यार्थ्यांना ‘एनएमएमएस’ तसेच भावी आयुष्यातील अनेक स्पर्धा परीक्षांसाठी या पुस्तकांचा नक्की उपयोग होईल व ते उज्ज्वल यश संपादन करतील”
Ans: राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक संच देण्यात आले.
Ans: यात मानसिक क्षमता चाचणी (MAT), शैक्षणिक योग्यता चाचणी (SAT) आणि पाच सराव परीक्षांच्या १० प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे.
Ans: पुणे, रायगड, रत्नागिरी आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील ५,५०० विद्यार्थ्यांना मोफत संच देण्याचे उद्दिष्ट आहे.






