कोण होणार पुणे, बीडचा पालकमंत्री (फोटो -सोशल मीडिया)
सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
सुनेत्रा पवार यांच्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली जाण्याचा अंदाज
पुणे आणि बीड जिल्ह्याचा असणार समावेश
राज्यात गेल्या आठवड्यात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. गेल्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे नेतृत्व कोण करणार अशी चर्चा सुरू झाली होती. आता या पक्षाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे असणार आहे. सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली आहे. त्यातच आता बीड आणि पुण्याचा पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवार यांचे निधन झाल्यावर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांना देण्यात आले आहे. त्यातच आता पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पावेअर यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याची पालकमंत्रीपदाची जबाबदारी होती. दरम्यान आता देखील बीड आणि पुणे जिल्ह्याचे नेतृत्व सुनेत्रा पवार यांनी करावे अशी मागणी होत असल्याचे समोर येत आहे. बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सुनेत्रा पवार यांनी स्वीकारावे अशी मागणी पक्षातील नेत्यांची असल्याचे समोर येत आहे.
Maharashtra Politics: “… मन अक्षरशः भरून येतंय”; DCM होताच सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट
DCM होताच सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट
“आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे. दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन. या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेला प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन.”
‘मी Sunetra Ajit Pawar शपथ घेते की..’; ऐतिहासिक क्षण! राज्याला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
राज्याला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या माजी खासदार सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली आहे. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. राजभवन येथे त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे सर्वाधिकार असणार आहेत.






