(फोटो सौजन्य: X)
जुन्या सिम कार्डमधून काढले 27 लाखांचे सोने! व्हायरल व्हिडिओनंतर ई-कचऱ्याला सोन्याचे भाव
व्हिडिओ झालाय व्हायरल
या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, डिलिव्हरी बॉय घाबरून दिलेल्या नंबरवर कॉल करत असताना एका महिलेचा आवाज तुम्हाला ऐकू येईल. ती डिलिव्हरी बाॅयला विचारते, “तुम्हाला पुढे स्मशानभूमी दिसते का?” जेव्हा डिलिव्हरी बॉय हो म्हणतो तेव्हा ती महिला उत्तर देते, “बस त्याच्या आत या.” जेव्हा डिलिव्हरी बॉयने घाबरून सांगितले की खूप अंधार आहे आणि तो घाबरला आहे, तेव्हा त्या महिलेने उत्तर दिले, “तुम्हाला का भीती वाटते? मी आत आहे.” मग ती म्हणाली, “समोरच्या विजेच्या खांबावर ये. माझी गाडी बिघडली, मी बाहेर येऊ शकत नाही.” पण स्मशानभूमीतील शांतता आणि महिलेच्या बोलण्याने डिलिव्हरी बॉय इतका घाबरला की त्याने धोका पत्करण्यास नकार दिला आणि सांगितले की, तुम्ही ऑर्डर कॅन्सल करा.
🚨 STRANGER THINGS HAPPENING 🚨 –Viral Video shows woman Ordering Food at the Graveyard
Delivery Agent declines to Enter
— Seriously not funny woman why she will do that?? pic.twitter.com/FZePgFgv44 — Gagan Choudhary (@choudhary_99415) February 1, 2026
या १ मिनिट १३ सेकंदाच्या व्हिडिओमुळे ऑनलाइन एक नवीन वाद निर्माण झाला आहे. नेटिझन्स सतत त्यांचे मत शेअर करत आहेत. अनेकजण म्हणतात की ते डिलिव्हरी बॉईजच्या धाडसाला सलाम करतात. कडक ऊन असो वा थंडी ते वेळेवर अन्न पोहोचवण्यासाठी आपले जीवन धोक्यात घालतात. हा व्हिडिओ @choudhary_99415 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “या डिलिव्हरी बॉयने खूप हुशारीने काम केले आहे. आता भूतांनीसुद्धा ऑनलाइन ऑर्डर द्यायला शिकले आहे! सावधान राहा, मित्रांनो! जय श्री राम” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ स्क्रिप्टेड आहे हे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे विश्वास ठेवण्यासारखं नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






