भारत आणि इंगल्ंड यांच्यातील चौथा टी- २० सामना रात्री १० वाजता सुरु झाला होता. परंतु आजच्या अंतिम सामन्यात सामन्याची वेळ पूर्णपणे वेगळी आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा टी२० सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता सुरू होईल, तर नाणेफेक सायंकाळी ६:३० वाजता होईल. हा सामना साउथहॅम्प्टन येथील रोझ बाऊल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
आतापर्यंत या मैदानावर १३ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी ९ वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला केवळ ४ सामने जिंकण्यात यश आले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा टी२० सामना तुम्ही सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनल्सवर टीव्हीवर थेट पाहू शकता. हा सामना दोन मोबाईल ॲप्सवर थेट प्रक्षेपित केला जाईल. सोनी लिव्ह ॲप व्यतिरिक्त, तुम्ही जिओस्टारवरही हा सामना थेट पाहू शकता.
श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाखाली भारताला आयर्लंड आणि इंग्लंड या दोन्ही संघाकडून लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. आज, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध क्लीन स्वीप टाळण्याचा प्रयत्न करेल. कर्णधार श्रेयस अय्यरदेखील आपल्या पहिल्या विजयाची प्रतीक्षा संपवण्यासाठी उत्सुक असेल.
टीम इंडियात मोठी उलथापालथ? सलग पराभवानंतर प्रशिक्षक देणार राजीनामा? BCCI मोठी कारवाई करणार






