फोटो सौजन्य - Social Media
IIFCL प्रोजेक्ट्स लिमिटेड (IPL) मध्ये नोकरीची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. संस्थेकडून मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर या पदांसाठी भरती प्रकिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट iifclprojects.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. एकूण ८ रिक्त पदांसाठी ही भरती राबवली जात असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ मे २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी शेवटच्या तारखेच्या आत अर्ज पाठवून संधीचा फायदा घ्यावा. निवड झाल्यानंतर उमेदवारांना आकर्षक वेतन मिळणार आहे.
या भरतीअंतर्गत मॅनेजर ग्रेड बी पदासाठी ४ जागा आणि असिस्टंट मॅनेजर (ग्रेड ए) पदासाठी देखील ४ जागा उपलब्ध आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठामधून बी.ई/बी.टेक, एलएलबी, सीए, एमबीए, पीजीडीएम किंवा पीजीडीबीएम यापैकी कोणतीही एक पदवी प्राप्त केलेली असावी. शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करणाऱ्या सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ₹600 आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ₹100 इतके शुल्क भरावे लागेल.
वयोमर्यादेबाबत सांगायचे झाले, तर IIFCL प्रोजेक्ट्स लिमिटेडने ठरवलेली वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी आहे. मॅनेजर ग्रेड बी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ४० वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तर असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए पदासाठी अर्ज करताना उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. वयाच्या गणनेत आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार सूट दिली जाणार आहे. याशिवाय, IIFCL प्रोजेक्ट्स लिमिटेडमध्ये केवळ या दोन पदांसाठीच नव्हे, तर इतर काही पदांसाठीही भरती प्रक्रिया सुरू आहे. याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी संस्थेच्या अधिकृत वेबसाइटला (www.iifclprojects.in) भेट द्यावी. अधिकृत अधिसूचनेत सर्व अटी, पात्रता, पदांची माहिती, पगारश्रेणी आणि इतर नियमावली स्पष्टपणे दिली आहे.
सरकारी क्षेत्रात मॅनेजमेंट पदावर स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरीची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. अशा नोकऱ्या केवळ आर्थिक स्थैर्य देत नाहीत, तर भविष्यासाठीही सुरक्षित पर्याय ठरतात. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ही संधी गमावू न देता लवकरात लवकर अर्ज सादर करावा. वेळेचे नियोजन करून अंतिम तारखेपूर्वी पूर्ण प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.