फोटो सौजन्य - Social Media
दिल्ली विकास प्राधिकरण (DDA) मार्फत 2025 मध्ये विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. भरती प्रक्रिया 27 मे 2025 पासून सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी DDA च्या अधिकृत वेबसाइट dda.gov.in वर जाऊन आपला अर्ज सादर करावा.
या भरतीत डिप्टी डायरेक्टर (आर्किटेक्ट, पब्लिक रिलेशन, प्लॅनिंग), असिस्टंट डायरेक्टर (प्लॅनिंग, आर्किटेक्चर, सिस्टिम, मिनिस्ट्रियल), AEE (सिव्हिल, इलेक्ट्रिकल), लीगल असिस्टंट, प्लॅनिंग असिस्टंट, आर्किटेक्चर असिस्टंट, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, प्रोग्रामर, जूनियर इंजिनिअर (सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल), स्टेनोग्राफर ग्रेड डी, नायब तहसीलदार, पटवारी, माळी, असिस्टंट सिक्योरिटी ऑफिसर, एमटीएस (मल्टी टास्किंग स्टाफ) यासह अनेक पदांचा समावेश आहे.
या भरतीमध्ये एकूण 1379 पदांसाठी नियुक्ती होणार असून सर्वाधिक जागा MTS (745 पदे) आणि जूनियर इंजिनिअर (104 पदे) या विभागात आहेत. विविध पदांसाठी पात्रता वेगवेगळी असून काही पदांसाठी 10वी उत्तीर्ण, ITI किंवा डिप्लोमा आवश्यक आहे, तर काही पदांसाठी अभियांत्रिकी, पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे गरजेचे आहे. त्यामुळे विविध शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती उपयुक्त ठरते. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 19 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे.
उमेदवारांची निवड प्रक्रिया कंप्युटर आधारित चाचणी (CBT), कौशल्य चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीच्या माध्यमातून पार पाडली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार पे लेव्हल 6 नुसार ₹35,400 ते ₹1,12,400 पर्यंत मासिक वेतन दिले जाईल. याशिवाय HRA, DA, TA यांसारखे विविध भत्तेही दिले जातील. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी DDA च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘ऑनलाइन अर्ज’ लिंकवर क्लिक करून आपली नोंदणी करावी, लॉगिन करून अर्ज फॉर्म भरावा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज शुल्क भरावे. अर्ज सादर केल्यानंतर त्याचा प्रिंटआउट सुरक्षित ठेवावा. ही संधी गमावू नका आणि आजच अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.