फोटो सौजन्य - Social Media
काही दिवसांअगोदर रखडलेली पोलीस भरती पुन्हा सुरु करण्यास शासनाकडून इशारा देण्यात आला होता. त्यावर अनेक उमेदवारांनी सकारात्मक प्रतिक्रियाही दिली. आणि शासनाकडून योग्यरित्या सारं काही अगदी सुरळीत सुरु होते. पण दरम्यान, शासनाने या भरती संदर्भात एका नवा निर्णय जाहीर केला आहे. वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही आता या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
काही दिवसांपासून अर्ज कर्त्या तसेच करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून सततची मागणी होत होती की वयोमर्यादेमध्ये वाढ करण्यात यावी. शासनाने उमेदवारांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि यामध्ये वाढ करण्यात आली आहे. पाहिले तर, एकूण १५ हजार ६३१ रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली होती. यामध्ये १० हजार ९०८ पदे पोलीस शिपाईसाठी आहेत. २३४ पदे पोलीस शिपाई चालक पदासाठी आहेत. बँड्स मॅन पदासाठी २५ पदे रिक्त आहेत. सशस्त्र पोलीस पदासाठी २३९३ पदे रिक्त आहेत, तर कारागृह शिपाई पदासाठी एकूण ५५४ पदे रिक्त आहेत.
इच्छुक उमेदवाराना या पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज करता येणार आहे, तसेच मोठ्या प्रमाणात अर्ज स्वीकारलेही जात आहे.
वयोमर्यादेत नक्की कोणत्या कारणाने देण्यात आली मुभा?
ही पोलीस भरती अनेक वर्षांपासून रखडली होती. कोव्हीड तसेच राज्यात घडलेल्या बरीच राजकीय तसेच इतर कारणांमुळे पोलीस भरतीवर गंभीर परिणाम झाला होता. इतक्या वर्षांमध्ये, पोलीस भरतीसाठी तयारी करू पाहणाऱ्या अनेक उमेदवारांनी वयाच्या मर्यादा ओलांडल्या. त्यांचा विचार करता, शासनाने वयोमर्यादेतील बंधने शिथिल केले आहेत आणि २०२२ ते २०२५ काळातील वयोमर्यादेच्या कारणामुळे रखडलेल्या उमेदवारांना दिलासा देण्याचे काम शासनाच्या या नव्या निर्णयाने केले आहे.